महाआघाडीने शेकापला दाखवला कात्रजचा घाट : उपनगराध्यक्ष निवडणुकीत भाजपला पाठिंबा

या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला मात्र धक्का बसला आहे.
Chetan Sinh Kedar-Sawant
Chetan Sinh Kedar-SawantSarkarnama

सांगोला (जि. सोलापूर) : सांगोला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी अनपेक्षितपणे महाविकास आघाडीच्या पाठींब्यावर भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांची निवड झाली. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला मात्र धक्का बसला आहे. गेल्या पाच वर्षांत चेतनसिंह केदार-सावंत यांंची दुसऱ्यावेळी उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे. (Mahavikas Aghadi supports BJP in Sangola vice-presidential election)

उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणुक शुक्रवारी (ता. ८ आक्टोबर) पार पडली. सकाळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याकडे उपनगराध्यक्षपदासाठी भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षाकडून भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी अर्ज दाखल करण्यात आला. आनंदा माने गट व शेकाप पक्षाकडून नगरसेवक गजानन बनकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला. एकपेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्याने दुपारी एकच्या सुमारास निवडणूक घेण्यात आली. सभागृहात प्रत्यक्ष मतदान हात वर करून घेण्यात आले.

Chetan Sinh Kedar-Sawant
'सत्ता जाऊन जाणार कोठे, हे माहीत होते.... म्हणूनच मी ठाकरेंचा हात वर केला!'

या निवडणुकीमध्ये चेतनसिंह केदार यांच्या बाजूने 11 नगरसेवकांनी, तर गजानन बनकर यांच्या बाजूने 10 नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. यामध्ये एका मताने चेतनसिंह केदार निवडून आल्याचे पिठासीन अधिकारी नगराध्यक्षा राणीताई माने यांनी जाहीर केले. चेतनसिंह केदार यांना स्वत: केदार यांच्यासह सचिन लोखंडे, जुबेर मुजावर, सतिश सावंत, भामाबाई जाधव, पूजा पाटील, सुनीता खडतरे, अनुराधा खडतरे, रंजना बनसोडे, शोभा घोंगडे, स्वाती मस्के यांनी, तर गजानन बनकर यांच्यासह नगराध्यक्षा राणीताई माने, आनंदा माने, प्रशांत धनवजीर, अस्मिर तांबोळी, अप्सर ठोकळे, छायाताई मेटकरी, सुरेश माळी, रफिक तांबोळी, स्वाती मगर यांनी मतदान केले.

Chetan Sinh Kedar-Sawant
शरद पवारांनी सोलापुरात मित्रालाच दिला जोरदार धक्का!

पीठासीन अधिकारी नगराध्यक्षा राणीताई माने यांनी चेतनसिंह केदार यांना प्रतिस्पर्धी उमेदवार गजानन बनकर यांच्यापेक्षा जास्त मत पडल्याने चेतनसिंह केदार यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केली. निवडीनंतर चेतनसिंह केदार यांनी आमदार शहाजी पाटील व राष्ट्रवादी कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी केली.

वेगळ्या राजकीय समीकरणांची नांदी?

शेतकरी कामगार पक्षाला उपनगराध्यक्ष निवडणुकीत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने या निवडणुकीत भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांना पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय झाला. नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकी यासंदर्भात महाविकास आघाडीने भाजपला दिलेली साथ वेगळ्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना? अशी चर्चा सध्या शहरात सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com