Mohol Assembly Election : मोहोळमध्ये पाटलांचा उमेदवार ठरला; महाविकास आघाडी कोणाला रिंगणात उतरवणार?

Mahayuti Vs Mahavikas Aghadi : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असणारे इंदापूर तालुक्यातील यशवंत माने यांची उमेदवारी मोहोळ मतदार संघासाठी माजी आमदार राजन पाटील यांनी पुन्हा एकदा जाहीर केली आहे.
Yashwant Mane
Yashwant ManeSarkarnama

Solapur, 09 July : माजी आमदार राजन पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोहोळ मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार यशवंत माने यांची उमेदवारी पुन्हा एकदा जाहीर केली आहे. मोहोळमध्ये पाटलांचा उमेदवार ठरला. आता महाविकास आघाडीकडून आमदार यशवंत माने यांच्या विरोधात कोण लढवणार, याची चर्चा मात्र जोर धरू लागली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय असणारे इंदापूर तालुक्यातील यशवंत माने (Yashwant Mane) यांची उमेदवारी मोहोळ मतदार संघासाठी (Mohol Assembly Constituency) माजी आमदार राजन पाटील यांनी पुन्हा एकदा जाहीर केली आहे. मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माने यांची उमेदवारी जाहीर करताना मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी दुप्पट मताने निवडून आणण्याचा निर्धारही राजन पाटील यांनी बोलून दाखवला.

विधानसभा निवडणुकीला दोन महिन्यांचा अवधी शिल्लक असतानाच राजन पाटील यांनी मोहोळमधून आमदार यशवंत माने यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी पुरेसा कालावधी मिळणार आहे. पण, माने यांच्या विरोधात कोण निवडणूक लढवणार, याचे आडाखे बांधले जाऊ लागले आहेत.

महाविकास आघाडीमध्ये ही जागा कोणाला सुटणार, यावरच अजूनही चर्चा निर्णय झालेला नाही. त्यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघातून यशवंत माने यांच्या विरोधात नेमके कोण निवडणूक लढवणार, हेच अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकत्रित राष्ट्रवादीकडे मोहोळ विधानसभा मतदारसंघ होता, त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे हा मतदार संघ जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले संजय क्षीरसागर यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर राहू शकते.

Yashwant Mane
Karmala Politics : काँग्रेसची स्वबळाची चर्चा अन्‌ जयवंतराव जगतापांनी घेतली सुशीलकुमार शिंदेंची भेट!

मोहोळ मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार रमेश कदम, राजू खरे यांच्यासह अनेकजण तयारीत आहेत. मात्र, महाविकास आघाडीकडून नेमकी कोणाला संधी मिळते, हे पाहावे लागेल.

राजन पाटील यांनी ठरवलेल्या उमेदवाराच्या विरोधात कोण निवडणूक लढवणार, याचा अंदाज कार्यकर्ते मात्र आपापल्या पद्धतीने बांधत आहेत. मुळात ही जागा कोणाला सुटणार आणि कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे समजायला आपल्याला विधानसभा निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे.

Yashwant Mane
Rajan Patil Announcement : मोहोळ विधानसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; राजन पाटलांनी मताधिक्याचा आकडाही जाहीर केला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com