Jaywantrao Jagtap-Sushilkumar Shinde
Jaywantrao Jagtap-Sushilkumar ShindeSarkarnama

Karmala Politics : काँग्रेसची स्वबळाची चर्चा अन्‌ जयवंतराव जगतापांनी घेतली सुशीलकुमार शिंदेंची भेट!

Jaywantrao Jagtap meet Sushilkumar Shinde : काँग्रेस सध्या महाविकास आघाडीत असली तरी पक्षाने राज्यातील 288 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे, त्याचाच एक भाग म्हणून इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात येत आहेत.
Published on

Karmala, 09 July : काँग्रेसने राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज मागवून घ्यायला सुरुवात केली आणि सोलापुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीकोनातून जगताप आणि शिंदेंची भेट झाल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे खासदार प्रणिती शिंदेही या वेळी उपस्थित होत्या.

काँग्रेस सध्या महाविकास आघाडीत असली तरी पक्षाने राज्यातील 288 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे, त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप (Jaywantrao Jagtap ) यांनी माजी केंदीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) आणि खासदार प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.

जयवंतराव जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचे काम केले, त्यामुळेच त्यांचे चिरंजीव भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चिरंजीव शंभूराजे जगताप यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. जगताप यांनाही भाजपने निमंत्रित सदस्य म्हणून कार्यकारिणीवर संधी दिली होती. मात्र, जगताप यांनी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतल्याने ते काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा सक्रिय होणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

जयवंतराव जगताप यांनी काँग्रेसमधून करमाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आता ते पुन्हा एकदा काँग्रेसतर्फे विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जगताप यांनी शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेऊन महाविकास आघाडीच्या पदरात आपली एकगठ्ठा मते टाकली होती. त्याचा परिणाम करमाळ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठे लीड मिळण्यात झाला हेाता.

Jaywantrao Jagtap-Sushilkumar Shinde
Devendra Fadnavis-Nawab Malik फडणवीस-मलिक पुन्हा समारोसमोर; फडणवीसांनी साधला संवाद, मलिकांचा हात जोडून नमस्कार

करमाळ्यातून संजय शिंदे यांना आमदार करण्यात माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा मोठा वाटा आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत जगताप गटाची सर्व मते शिंदे यांना मिळाल्यामुळे ते करमाळ्यातून आमदार झाले होते, त्यामुळे करमाळ्याच्या राजकारणात जयवंतराव जगताप यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे

सुशीलकुमार शिंदेंसोबत जुने ऋणानुबंध : जयवंतराव जगताप

या भेटी संदर्भात जयवंतराव जगताप म्हणाले, माझे सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत जुने ऋणानुबंध आहेत. आमचे भावनिक नाते आहे, त्यामुळे आज झालेली भेट ही सदिच्छा भेट होती. स्थानिक राजकारण, राजकीय परिस्थितीमुळे आम्ही वेगवेगळे झालाे असले तरी माझी त्यांच्यावरील श्रद्धा आणि माझ्यावरील त्यांचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. सुशीलकुमार शिंदे, शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी माझी भावनिकदृष्ट्या नाळ जोडलेली आहे.

Edited by : Vijay Dudhale

Jaywantrao Jagtap-Sushilkumar Shinde
Chandrapur Assembly Election : खासदार प्रतिभा धानोरकरांनी चंद्रपूरसाठी पुन्हा लावली ‘फिल्डिंग’; विधानसभेसाठी बडा मासा गळाला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com