Gokul: गोकुळच्या मैदानात महायुतीतील 'मोठा भाऊ' कोण? मुश्रीफांचा दावा, महाडिकांचा पलटवार, चंद्रदीप नरकेंचा दोघांनाही टोला

Mahayuti, Gokul Milk Union Election, Hasan Mushrif: गोकुळ दूध संघ निवडणुकीपूर्वी महायुतीत मोठा पक्ष कोण यावरून हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक आणि चंद्रदीप नरके यांच्यात दावे-प्रतिदावे रंगले असून जागावाटपाचा तिढा अधिक गडद होण्याची शक्यता आहे.
Dhananjay Mahadik, Hasan Mushrif
Dhananjay Mahadik, Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Gokul Milk Union Election: मागील तीन महिन्यांपासून चर्चेत असलेल्या गोकुळ दूध संघाचे राजकारण चांगलेच तापले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असताना महायुतीमधील अंतर्गत राजकारणानेच गोकुळच्या राजकारणात रंगत आणली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना, जनसुराज्य शक्ती आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र निवडणूक लढवणार असले तरीही ठराव दाखल करत असताना घेतलेले स्वतंत्र मेळावे, यातूनच एकमेकांबद्दल असलेला आकस स्पष्टपणे जनतेसमोर आणि दूध उत्पादकांसमोर येत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेले शक्ती प्रदर्शन, या मेळाव्यामध्ये केलेल्या मोठ्या भावाचे वक्तव्य, यावरून धनंजय महाडिक यांनी भाजपच मोठा भाऊ ठरेल असा दावाकरून दिलेला शह, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी कोणीच मोठं नसल्याचे केलेल्या वक्तव्य यावरूनच महायुतीतील अंतर्गत कुरघोडी समोर येत आहेत.

गोकुळच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना व जनसुराज्य असे चार पक्ष एकत्र आहेत. प्रत्यक्षात या चारही पक्षांनी स्वतंत्र शक्तिप्रदर्शन करत आपापले ठराव दाखल केले आहेत. महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रच लढणार, असा दावा या सर्वांकडून केला जात असताना प्रत्यक्ष ठराव दाखल प्रक्रियेतच महायुतीतील कट-शहकटाचे राजकारण दिसत आहे.

Dhananjay Mahadik, Hasan Mushrif
Gokul Election: भाजपचा डाव महायुतीवर उलटला! मुश्रीफ-सतेज पाटील यांचेही मनसुबे उधळले; गोकुळच्या राजकारणात मोठा ट्विस्ट

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्ती प्रदर्शन करत ठराव दाखल केले. मात्र दाखल केलेल्या ठरावाच्या आकडेवारीवर बोट ठेवत भाजपच्या व्यासपीठावरून अप्रत्यक्षपणे त्याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपकडून ठराव दाखल करत असताना गोकुळच्या संचालिका शोमिका महाडिक आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आपण दाखल करत असलेल्या ठरावांमध्ये कोणत्याही संस्था बोगस, अवसायनातील आणि एसआयटी चौकशी लागलेल्या नाही. असे सांगत मुश्रीफ यांच्या ठरावावर बोट ठेवले आहे.

दोन दिवसांपूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीने ठरावधारकांचा मेळावा घेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी आमच्याकडे १९८२ ठराव असल्याचे सांगत महायुतीत राष्ट्रवादी हाच मोठा भाऊ असल्याचा दावा मंत्री मुश्रीफ यांनी केला होता. त्यांच्या या दाव्याला आता भाजप आणि शिवसेना पक्षांकडूनच आव्हान देण्यात येत आहे. भाजपच्या मेळाव्यात खासदार महाडिक यांनी राष्ट्रवादीने दाखल केलेल्या ठरावांत अन्य पक्षांचेही सुमारे २७५ ठराव असल्याची आकडेवारी जाहीर करून मंत्री मुश्रीफ यांचा दावा खोडून काढतानाच भाजपच महायुतीत मोठा पक्ष असल्याचा दावा केला.

Dhananjay Mahadik, Hasan Mushrif
Gokul Elections : 'गोकुळ'मध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेला ओव्हरटेक करत भाजप 'मोठा भाऊ' बनणार? महायुतीत वादाची पहिली ठिणगी

चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी थेट मंत्री मुश्रीफ यांनाच या निवडणुकीत आव्हान दिल्याने वातावरण तापले आहे. भाजपच्या व्यासपीठावरूनच त्यांनी ज्या संस्था अपात्र झाल्या आहेत त्यांच्या समर्थनात जे न्यायालयात जातील त्यांच्या विरोधात आम्ही देखील न्यायालयात जाऊ अशी भूमिका घेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना आपला विरोधच असल्याचं सांगितले आहे.

एकीकडे भाजप, राष्ट्रवादीत 'मोठा भाऊ' वरून दावे-प्रतिदावे सुरू असतानाच शिवसेनेच्या मेळाव्यात मात्र महायुतीत कोण मोठा आणि छोटा भाऊ नसल्याचे सांगत आमदार चंद्रदीप नरके यांनी या दोन्ही पक्षांची हवाच काढून टाकली. महायुती म्हणून आपण सर्व एक असल्याचे सांगत नरके यांनी इतर पक्षांकडील ठराव आपल्याकडे आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. जागा वाटपाचा तिढा शक्य ठरावांच्या संख्येवरून महायुतीतील घटक पक्षांना जागा मिळणार हे जवळपास निश्चित आहे; पण आतापासूनच ठरावांच्या संख्येवरून एकमेकांवर महायुतीतच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष जागा वाटपात तिढा निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com