
Mahayuti Government Loan Waiver : महायुतीने निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजनेसह शेतकऱ्यांची 100 टक्के कर्जमाफीचा शब्द दिला होता. महायुती सत्तेत बसली आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द पूर्ण करण्यासाठी महायुती सरकारने समिती स्थापन केली असून, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे समितीचे नेतृत्व असणार आहे. या समितीचा अहवाल महिन्याभरात येणार आहे. तोपर्यंत सक्तीनं कर्जवसुली केल्यास बँकांची कार्यालये पेटवून देऊ, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिला.
रघुनाथ पाटील यांनी शेतकऱ्यांच्या (Farmer) कर्जमाफीकडे लक्ष वेधताना, उभारलेल्या संघर्षाची माहिती दिली. शेतकरी संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीपासून महाराष्ट्रातील सरकारच्या धोरणाचे पहिले बळी ठरलेले साहेबराव करपे यांच्या स्मृती दिवसापर्यंत कर्जमुक्ती जनजागरण अभियानाचा महाराष्ट्रात प्रचार कला. पुणे इथल्या कृषी आयुक्त, सहकार आयुक्त यांच्या दारात समारोप सभा झाली. यानंतर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यासंदर्भात 21 मार्चला आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे, याकडे लक्ष वेधले.
कर्जमुक्तीसाठी संघटनेने केलेल्या आंदोलनाचे फलित आहे, असे सांगताना महायुती (Mahayuti) सरकारने समितीने नेमताच बँकांनी शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्ज वसुलीचे धोरण अवलंबले आहे, याकडे लक्ष वेधले. कर्ज वसुलीसाठी बँकांकडून जप्तीची देखील कारवाई सुरू झाली. ही कारवाई तत्काळ थांबवा, अशी मागणी रघुनाथ पाटील यांनी केली.
महायुती सरकारने समिती स्थापन करताच बँकांकडून कर्ज वसुली सक्तीने सुरू केली आहे. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीचा अहवाल महिन्याभरातच येणार आहे. तोपर्यंत महायुती सरकारने बँका, पतसंस्था आणि सोसायट्यांची कर्ज वसुली थांबवावी, अशी मागणी रघुनाथ पाटील यांनी केली आहे.
कर्ज वसुलीसाठी बँका, सोसायट्या, पतसंस्थांनी शेतकऱ्यांकडे तगादा लावला आहे. तशा तक्रारी येत असून, यातून काही विपरीत झाल्यास, शेतकरी संघटना आक्रमक झाल्यास, सोसायट्यांची, बँकांची कार्यालये पेटवून देतील, बँकांना टाळे ठोकू, असा इशारा रघुनाथ पाटील यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.