Sujay Vikhe And Ram Shinde : लोकसभेला आव्हान दिलेल्या राम शिंदेंचा 'तो' सल्ला सुजय विखेंना रूचणार का?

Maharashtra Legislative Council Chairman Ram Shinde political rehabilitation BJP ex-MP Sujay Vikhe : भाजप माजी खासदार सुजय विखे यांना राजकीय पुनर्वसनाच्या मागणीवर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
Sujay Vikhe And Ram Shinde
Sujay Vikhe And Ram Shindesarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंना सुरवातीला स्वकीय राम शिंदेंनी चांगलेच आव्हान उभं केले होते. राम शिंदे लोकसभेच्या तिकिटाच्या रेसमधून बाहेर पडल्यानंतर प्रचारात देखील शेवटच्या टप्प्यात सहभागी झाले. लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंना पराभवाचा धक्का बसला.

तेव्हापासून सुजय विखे राजकीय पुनर्वसनासाठी प्रयत्न करत आहे. आमदार शिवाजी कर्डिले यांनी महायुतीच्या सर्व आमदारांचा सत्कार केला. तेव्हा विखेंनी आपल्या राजकीय पुनर्वसनाकडे सर्वांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सुजय विखेंना 'श्रद्धा-सबुरी'चा सल्ला दिला. राम शिंदेंनी सुजय यांना दिलेला हा सल्ला विखे-शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष पूर्णविरामाकडे जाणार असे दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगरमध्ये महायुतीला जबर धक्का बसला. दोन्ही जागांवर पराभव झाला. भाजपचा (BJP) दिग्गज उमेदवार सुजय विखे यांचा पराभव झाला. विखे पिता-पुत्रांना हा पराभव चांगलाच जिव्हारी लागलाय. लोकसभातील पराभवाचा वचपा विधानसभेत महायुतीने भरून काढला. जिल्ह्यातील 12 पैकी 10 जागांवर विजय मिळवला.

Sujay Vikhe And Ram Shinde
Disha Salian Death Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाच्या याचिकेनंतर वडील सतीश यांनी पोलिस आयुक्तांची पहिल्यादांच घेतली भेट (VIDEO)

या महायुतीच्या आमदारांच्या सत्कार कार्यक्रमात सुजय विखेंनी माझा कुठेतरी विचारा व्हावा, असे सांगून राजकीय पुनर्वसनाची इच्छा व्यक्त केली. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी माझ्यासारख्या माजीचा करा. पुनर्वसनाचा विचार करा. कर्डिले-राम शिंदेंनी यासाठी पुढाकार घ्यावा. अन्यथा मी केवळ भाषणापुरता राहील, लोक मला विसरून जातील, असे गंमतीने म्हणता पुनर्वसनाकडे लक्ष वेधले.

Sujay Vikhe And Ram Shinde
Husain Dalwai : संभाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणे मारलं, इतिहासाचा हा पैलू फडणवीस मान्य करतील का?

सुजय विखे यांनी गंमतीने पुनर्वसनाच्या मागणीकडे लक्ष देताना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी, आपल्यासारखी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी. राज्यसभेसाठी एक जागा आहे. त्यासाठी शुभेच्छा देखील राम शिंदेंनी दिल्या.

शिंदेंनी विखेंसमोर उभं केलं होतं आव्हान

लोकसभा निवडणुकीत महायुतीला अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर पराभवाला समोरे जावे लागले. भाजपच्या पहिल्या यादीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे यांचा देखील पराभव झाला. राम शिंदे यांचा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी असलेला राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी तो उफाळून आला होता. राम शिंदे यांच्याबरोबर भानुदास बेरड देखील भाजपच्या तिकिटासाठी इच्छुक होते.

'श्रद्धा-सबुरी'चा सल्ला

राम शिंदेंनी यात आघाडी उघडली होती. सुजय विखेंना तिकिट मिळाले. पण, राम शिंदे सुरवातीला काही दिवस प्रचारापासून दूर राहिले. देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात येत विखे-शिंदे यांच्यात दिलजमाई केली. शिंदे शेवटच्या क्षणी प्रचारात उतरले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. निकालानंतर कर्जत-जामखेडमधून विखेंचे मताधिक्य घटल्याचे समोर आले. आता राजकीय पुनर्वसनासाठी धडपड असणाऱ्या विखेंना राम शिंदेंनी त्यांना 'श्रद्धा-सबुरी'चा दिलेला सल्ला कितपत रूचणार, हा प्रश्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com