MNS News: खंडणी अन् अपहरण...! मनसेच्या कामगार सेनेच्या 'या' बड्या नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

MNS Leader Crime : मनसे कामगार सेनेच्या चिटणीस पदावर सक्रीय असलेल्या सुजय ठोंबरे याला खंडणी व अपहरणप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. ठोंबरे आणि अन्य 4 जणांवर पांडुरंग मोरे नावाच्या एका कंपनीच्या मालकाचे अपहरण करत त्याच्याकडे खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
MNS, Raj Thackeray
MNS, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण व हत्येप्रकरणानंतर महाराष्ट्राचं राजकारण गेले तीन महिने तापलं आहे. राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. अशातच मनसेच्या चिटणीसपदाची जबाबदारी असलेल्या नेत्याला खंडणी आणि अपहरणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीतील मोठ्या अपयशानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मनसेच्याप्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. याचदरम्यान, आता मनसे कामगार सेनेतील एका नेत्याला अटक करण्यात आली आहे.

मनसे कामगार सेनेच्या चिटणीस पदावर सक्रीय असलेल्या सुजय ठोंबरे याला खंडणी व अपहरणप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. ठोंबरे आणि अन्य 4 जणांवर पांडुरंग मोरे नावाच्या एका कंपनीच्या मालकाचे अपहरण करत त्याच्याकडे खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

MNS, Raj Thackeray
Sujay Vikhe And Ram Shinde : लोकसभेला आव्हान दिलेल्या राम शिंदेंचा 'तो' सल्ला सुजय विखेंना रूचणार का?

मुंबई पोलिसांनी ठोंबरे याला मुंबईतील आझाद मैदानात अटक केली आहे.त्याला 10 लाखांची खंडणी आणि अपहरण प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.यावेळी अपहरणासाठी वापरलेली थार कंपनीची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

आता आझाद मैदान पोलिसांनी या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 5 जणांना अटक केली आहे. सध्या याप्रकरणाचा तपास सुरू आहे.यावेळी सुजय ठोंबरे आणि त्यांच्या समवेतच्या इतर आरोपींनी पांडुरंग मोरे यांना शिवीगाळ करत त्यांना धमकी देत मनसे (MNS) दादर कार्यालयात घेऊन जातोय,असं सांगितलं. पण त्याचवेळी आरोपींनी तडजोडीसाठी 10 लाख द्या,अशी मागणी करण्यात वेळी आली. सध्या याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

MNS, Raj Thackeray
Raosaheb Danve News : कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नात रावसाहेब दानवे झाले आचारी! पोहे बनवून सगळ्यांना खाऊ घातले..

राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना भरला दम

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासह पक्षातील प्रत्येकाच्या जबाबदारीविषयी भाष्य केलं. ते म्हणाले,दर 15 दिवसाला त्यांच्यासह सर्व पदाधिकारी यांची कामाचा आढावा घेतला जाणार आहे. यात महिना दीड महिन्यात कुणात कामचुकारपणा दिसला,मग तो कुणी का असेना, तर त्याला आपण पदावर ठेवणार नाही”,असा सज्जड दमही पदाधिकारी यांना भरला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com