
Sangli News : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक शहरे आणि गावांच्या नावात बदल करण्यात आला आहे. त्यातपद्धतीने रस्ते आणि रेल्वे स्थानकांची नावे देखील बदलण्यात आली आहेत. पण केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात भाजपप्रणित महायुतीचे सरकार आल्यापासून नामांतराच्या प्रक्रियेला मोठा वेग आला आहे. राज्यातील अहमदनगर (अहिल्यानगर) , उस्मानाबाद (धाराशिव) आणि औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्यांची आणि शहरांची नावे बदण्यात आल्यानंतर आता आणखी एका शहराचे नाव बदलण्यात येणार आहे. याची शासनस्तराव कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असून भाजपनेत्यांनी केलेल्या प्रयत्नांना आता यश येणार आहे.
जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात आला. तर नाव विचारून पर्यटकांची हत्या केल्याने या प्रकरणाला धार्मिक रंग चढला ज्यानंतर सांगलीतील 40-50 वर्षांपासून रखडलेल्या मागणीने पुन्हा उचल खाली. तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी मागणी लावून धरली. यामुळे आता इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर होण्याच्या प्रक्रियेला मोठा वेग आला आहे.
पण याची मागणी 40 वर्षांच्या आधी झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन शहर प्रमुख पंत सबनीस यांनी शहराच्या नामांतराची मागणी केली होती. त्यावेळी शिवसेना हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1986 साली येथील यल्लामा चौकात जाहीर सभा घेत इस्लामपूर नाही तर ईश्वरपूर असा उल्लेख केला होता. त्यानंतरच पहिल्यांदा ईश्वरपूर असा उल्लेख झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा नामांतराच्या मागणीने उचल खाल्ली आहे.
चार ते पाच वर्षांच्याआधी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी सह्यांची मोहिम राबवून इस्लामपूर शहराचे नाव बदलण्याची मागणी केली होती. पण हा मुद्दानंतर मागे पडला होता. पण गेल्या आठवड्यात माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून यासंदर्भात निवेदन दिले. यानंतर आता हा विषय पुढील दोन ते तीन महिन्यात मार्गी लागेल असा अशावाद दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे. नामांतराची मागणी पूर्ण झाल्यास येथील विधानसभा मतदारसंघासह, तालूका, नगरपरिषदचेही नावात बदल होणार होईल.
दरम्यान या मागणीचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनही केले आहे. त्यांनी, एखाद्या जात किंवा धर्माचा उल्लेख शहारांच्या नावात असू नये, असा शासन निर्णय आहे. याआधी या शहराचा मी नगराध्यक्ष असताना 10 हजार सह्यांचे निवेदन मी सरकारला दिले होते. तसेच शहराच्या नामांतराची मागणी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.