Sadabhau Khot News: सरकार बदलताच ठराविक नेते पक्षांतर करतात. सध्या केंद्रात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी पक्षात सामील होण्यासाठी धडपड सुरू आहे. या दलबदलू नेत्यांचा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी समाचार घेतला.
माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सतत पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले, सरकार बदलतच अनेक लोक सत्ताधारी पक्षात सामील होतात. सर्व ठराविक मंडळीच सतत इकडून तिकडे जात असतात. लोकांशी प्रामाणिक किंवा लोकांमध्ये राहणारा कार्यकर्ता पक्षांतराच्या भानगडीत पडताना दिसत नाही.
नुकतेट भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला रिकामी करा. त्यांच्या नेत्यांना फोडा व भाजपमध्ये आणा असे आवाहन केले होते. राज्यात व केंद्रात भाजप सत्तेवर आल्यापासून हा पक्ष विरोधकांच्या विविध नेत्यांमागे तपास यंत्रणा लावून त्यांचे पक्षांतर घडवत असतो. या पार्श्वभूमिवर खोत यांचे विधान चर्चेचा विषय ठरले आहे.
ते म्हणाले, एखादा सरपंच अथवा गाव स्तरावर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांनी पक्षांतर केल्याचे अपवादानेच दिसते. सतत राजकारणात राहून सत्तेजवळ जाणारे पक्षांतर करतात . त्याचे जनतेला ही फारसे काही वाटत नाही. त्याकडे लोक दुर्लक्ष करतात.
सध्या केंद्रात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय नेते पक्षांतर करत असतात. सर्व नेते ठराविक असतात. राज्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. त्यांच्या मुलांची लग्न होत नाही. शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न सोहळे थांबले आणि सध्या राजकीय नेत्यांचे प्रवेश सोहळे सुरू झाले आहे, याची खंत वाटते.
सरकार बदलल्यावर मतदारसंघाच्या विकासासाठी पक्ष बदलला, असे सांगणारे नेते आहेत. त्यांना जनता चांगले ओळखून आहे. त्यांना आत्ता विकास आठवत असेल तर, ५० वर्षे सत्तेत असताना काय ङजामती केल्या का? असा परखड सवाल त्यांनी केला.
सध्या केंद्रात आणि राज्यात मातीपेक्षा जातीला महत्त्व आल्याचे खोत म्हणाले. राजकारणात ठराविक जातीचे नेते अलिकडे मोठ्या प्रमाणात उदयास येऊ लागले आहेत. जी जात श्रेष्ठ त्या जातीचा नेता राजकीय पटलावर महत्त्वाचा व वजनदार मानला जातो. हे एक नवे राजकीय समिकरण तयार होऊ लागले आहे. मातीतली माणसं आणि त्यांची व्होट बँक तयार होणार नाही, तो पर्यंत शेतकऱ्याला व मातीला न्याय मिळणे दुराप्रास्त असेल.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.