Koregaon News : शशिकांत शिंदेंचा महेश शिंदेंना टोला; कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी त्यांची पोपटपंची...

Shashikant Shinde खासदार शरद पवारांवर शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
Mahesh Shinde, Shashikant Shinde
Mahesh Shinde, Shashikant Shindesarkarnama
Published on
Updated on

Koregaon News : बाजार समितीच्या निवडणुकीत महेश शिंदेंनी Mahesh shinde आत्मविश्वास गमवल्याने कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी त्यांची पोपटपंची सुरु आहे. पोपटपंची कोण करतंय हे मतदारांनी बघितले आहे. राष्ट्रवादीतील NCP विभागणीमुळे त्यांना आजपर्यंत निवडणुक जिंकता आली. स्वत:च्या हिंमतीवर ते जिंकू शकत नाहीत, असा सणसणीत टोला आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी महेश शिंदेंना लगावला.

खासदार शरद पवारांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी श्री. पवारांसह अजित पवारांवर टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. खासदार शरद पवारांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी श्री. पवारांसह अजित पवारांवर Ajit Pawar टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

शशिकांत शिंदे म्हणाले, बाजार समितीच्या निवडणुकीतील अपयशानंतर त्यांनी आत्मविश्वास गमवलेला आहे. काही तरी बोलून कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी त्यांनी पोपटपंची सुरु केली आहे. हार, जीत होत असते. मी चर्चा करताना तारतम्य बाळगून करतो. पोपटपंची कोण करतंय हे सर्व मतदारांनी बघितले आहे. एकनाथ शिंदेंना Eknath Shinde मीच मुख्यमंत्री केलं, सरकारच मीच बसवले, भविष्यात सरकार बसवायचे का हे मीच ठरवणार, ही त्यांची पोपटपंची सातारा जिल्ह्याने बघितली आहे. आता पोपट घेऊन बसणारेच आता पोपट घेऊन बसतील का हे माहिती नाही.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Shashikant Shinde Vs Mahesh Shinde: त्यांना लाज वाटली पाहिजे; महेश शिंदेंनी शशिकांत शिंदेंची लाज काढली...

त्यांच्या बॅनरवर कोणाचे फोटो होते, हे सर्वांनी बघितले आहे. लोकांना भूलथापा देऊन त्यांनी आजपर्यंत निवडणूका लढवल्या. ते स्वत:च्या हिंमतीवर जिंकू शकत नाहीत. आमच्या राष्ट्रवादीत विभागण्या झाल्याचा त्यांनी आजपर्यंत फायदा घेतला. पण यावेळेस बाजार समितीच्या APMC Election निवडणुकीत आमच्यात विभागणी झाली नाही. त्यामुळे त्यांना निवडणूक जिंकता आली नाहीत. रामराजे, बाळासाहेब पाटील आणि मी स्वत: एकत्र राहिलो त्यामुळे आम्ही निवडणुक जिंकली

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Satara News : शिंदेंची शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट; ४० आमदारांसह वजीर गायब होणार...

जे त्यांच्या पक्षातून गद्दारी करुन बाहेर पडले आता ते आहेत तेथे ब्लॅकमेलिंग करतात. भविष्यात कुठल्या पक्षात असतील त्याचा भरोसा नाही. त्यांनी आमच्या पक्षाची चिंता करु नये. त्यांनी स्वत: ची चिंता करावी. भविष्यात निर्णय काय होईल, याची चिंता करावी. निवडणुकीत लोक तुम्हाला जागा दाखवणार आहेत. पण त्या आधी न्यायालयाने तुम्हाला सहा वर्षे अपात्र ठरला तर तुमची काय अवस्था होईल, याचा विचार करावा.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Supreme Court Result On Political Row: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल 8 ते 12 मे दरम्यान लागणार?

नियती कधीही माफ करत नसते. त्यामुळे स्वत:च्या अस्तित्वाची काळजी करा मग दुसऱ्या पक्षाचा विचार करा, असा सल्लाही त्यांनी महेश शिंदेंना दिला. वजीर निघून चालला म्हणून पवार साहेबांनी राजीनामा दिला असे म्हणणे हस्यास्पद आहे. लोकशाहीत वेगवेगळ्या भूमिका मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. पवार साहेबांसह सर्व नेते एकत्र आहेत.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Sharad Pawar Live: शरद पवारांचा राजीनामा अखेर मागे; कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून घेतला निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com