

Satara, 30 April : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून देणारी घटना पुढे आली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि औंध संस्थानच्या राणी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. गायत्रीदेवी या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय असून खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्या लवकरच कमळ हाती घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
गायत्रीदेवी यांनी नुकतीच कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत औंध (ता. खटाव) परिसरातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी गायत्रीदेवी यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, यासाठी त्यांना कार्यकर्त्यांकडून आग्रह होत आहे. त्यातून त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या होत्या. तसेच, उपमुख्यमंत्री अजितदादांच्या माध्यमातून औंध परिसरातील अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. उर्वरीत कामे मार्गी लावण्यासाठी त्या आता भाजपच्या वाटेवर आहेत.
गायत्रीदेवी यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयामुळे साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. कारण औंध आणि परिसरात मोदी लाटेतही त्यांनी भाजपला प्रवेश करू दिला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला त्यांनी अबाधित राखला होता, त्यामुळे गायत्रीदेवींच्या भाजप प्रवेशामुळे खटाव तालुक्यात पक्षाची ताकद वाढणार आहे.
औंध परिसरातील सुमारे २१ गावांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. तो सोडविण्याच्या दृष्टीकोनातून गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी भाजपसोबत जावे, अशी मते बैठकीतील कार्यकर्त्यांनी मांडली. कार्यकर्त्यांच्या भावना गायत्रीदेवी यांनी ऐकून घेतल्या. मात्र आपली भूमिका त्यांनी अद्याप जाहीर केलेली नाही.
गायत्रीदेवी ह्या लवकरच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या माध्यमातून त्या विकास कामांसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवेंद्रराजेंच्या भेटीनंतरच गायत्रीदेवी भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आह
आता गायत्रीदेवी यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यास राजघराण्यातील आणखी एक व्यक्ती पक्षाशी जोडले जाणार आहे. कारण खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघेही अगोदरच भाजपमध्ये कार्यरत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.