BMC Election Results 2026: 'डॅडी'चा बालेकिल्ला असलेल्या दगडी चाळीतच दोन्ही मुलींचा पराभव

Arun Gawli daughters defeat: योगिता या अरुण गवळीच्या लहान कन्या आहेत. योगिता या गवळी कुटुंबातील तिसरी व्यक्ती आहेत ज्या थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.
BMC Election Results 2026 Arun Gawli daughters defeat
BMC Election Results 2026 Arun Gawli daughters defeatSarkarnama
Published on
Updated on

Dagdi Chawl Election Results : दगडी चाळीतील कुख्यात गँगस्टार अरुण गवळी याचा अखिल भारतीय सेनेकडून त्यांच्या दोन्ही मुली महापालिका निवडणुकीच्या रिंगणात होत्या. गीता गवळी या 212 क्रमांच्या वॉर्डमधून तर योगिता गवळी वॉर्ड क्रमांक 207 मधून उमेदवार होत्या. त्यांना भाजपच्या उमेदवारांनी धूळ चारली आहे. भायखळा परिसरात ज्या ठिकाणी दगडी चाळ आहे. त्या परिसरात हे वार्ड येतात. 'डॅडी'च्या बालेकिल्ल्यातच त्यांच्या दोन्ही मुलींचा पराभव झाला आहे.

अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी हिचा मुंबई महापालिका निवडणुकीत भायखळा प्रभाग क्रमांक 207 मधून पराभव झाला आहे. योगिता गवळी ही भायखळा प्रभाग क्रमांक 207 मधून अखिल भारतीय सेनेकडून निवडणूक लढवली होती. मात्र तिचा भाजपच्या उमेदवाराकडून पराभव झालाय. गीता गवळी यांचं शिक्षण एमएससीपर्यंत झालं आहे तर योगिता एमए शिकल्या आहेत.

BMC Election Results 2026 Arun Gawli daughters defeat
Pune Election Result: सातव्यांदा नगरसेवक होण्याचे स्वप्न भंगले; माजी उपमहापौरांना महापालिका सभागृहाचा रस्ता बंद; भाजपने धूळ चारली

2019 ची विधानसभा निवडणूकही गीता गवळी यांनी लढली होती, त्यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता 3.38 कोटी रुपये होती. या निवडणुकीत त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची मालमत्ता दुपटीने वाढली असल्याचे दिसते.

योगिता गवळी यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता 3.65 कोटी रुपये इतकी आहे. योगिता यांच्या नावावर 750 ग्रॅम दागिने आहेत. त्यांच्या पतीच्या नावावर बीएमडब्ल्यू कार याशिवाय 250 ग्रॅम दागिने आहेत. योगिता या अरुण गवळीच्या लहान कन्या आहेत. योगिता या गवळी कुटुंबातील तिसरी व्यक्ती आहेत ज्या थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com