Makai Sugar Factory : 'मकाई'चे सभासद आक्रमक; शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, नेमकं काय झालं ?

Karmala Farmers : कारखान्यासह प्रशासनानेही घेतली नाही निवेदनाची दखल
Farmers Attempt Suicide
Farmers Attempt SuicideSarkarnama
Published on
Updated on

Solapur Political News : करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा परिवार असणारा मकाई सहकारी साखर कारखाना सातत्याने वादाच्या भोवर्‍यात सापडत आहे. काही दिवसांपूर्वी बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी एका शेतकऱ्याला केलेल्या मारहाणीचे प्रकरण ताजे असतानाच दुसरी मोठी घटना आली आहे. थकीत रकमेसाठी एका शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. परिणामी कारखान्याचे सभासद आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

मकाईचे थकीत बिल मिळावे, यासाठी शेतकऱ्यांचे करमाळा (Karmala) तहसीलसमोर बोंबाबोंब आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात हरिदास मोरे या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे आंदोलनस्थळी मोठी धावपळ उडाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, वेळीच इतर शेतकऱ्यांसह प्रशासनाने हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Farmers Attempt Suicide
Veer Savarkar : भाजप, शिवसेना, मनसेला स्वातंत्र्यवीर राजकारणासाठीच हवेत; पण त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन नकोय...

हरिदास मोरेंनी काही दिवसांपूर्वी मकाई कारखान्याने (Makai Sugar Factory) उसाचे थकीत बिल देण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, साखर आयुक्त तसेच कारखान्याचे चेअरमन यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची मात्र ना प्रशासनाने ना कारखान्याने दखल घेतली. त्यामुळे अखेर हरिदास मोरे यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात मकाई कारखान्याच्या प्रलंबित ऊसबिलाच्या मागणीसाठी बोंबाबोंब आंदोलन आयोजित केले होते. या आंदोलनात त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे (Sanjay Shinde) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यातील कारखान्याच्या थकीत बिलाच्या संदर्भात जिल्हाधिकारी तहसीलदार आणि सहकार आयुक्तांशी पत्रव्यवहार, चर्चा करीत आहोत. या संदर्भात सकारात्मक वक्तव्य केले होते. त्यानंतर दोनच दिवसांनंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये पोटेगाव येथील मोरेंनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेतून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊसबिलाचा प्रश्न किती गंभीर असल्याचे स्पष्ट होते. यावर आता बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकरांच्या भूमिकेकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Farmers Attempt Suicide
Shiv Sena Election Strategy : निवडणूक लोकसभेची; स्ट्रॅटेजी विधानसभेची, ठाकरेंचे सोलापूरसाठी मोठे डावपेच

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com