Sharad Pawar News : मकरंद पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट; तेथेही किसन वीर कारखान्यांचीच पवारांना चिंता

Makrand Patil अजित पवार गट राष्ट्रवादीचे वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांनी आज गोविंद बागेत जाऊन खासदार शरद पवार यांची भेट घेतली.
Makrand Patil, Sharad pawar, Nitin Patil, Shamrao Gadve
Makrand Patil, Sharad pawar, Nitin Patil, Shamrao GadveAspak Patel, Khandala
Published on
Updated on

Satara NCP News : अजित पवार गट राष्ट्रवादीचे वाईचे खासदार मकरंद पाटील यांनी आज गोविंद बाग येथे जाऊन खासदार शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचे सांगण्यात येत असले तरी जिल्ह्याच्या राजकिय वर्तूळात खळबळ उडाली आहे. यावेळी खासदार शरद पवार यांनी आवर्जून किसन वीर कारखाना व खंडाळा कारखान्यांचे गाळप सुरु झाले का, काही अडचणी आहेत का, याची माहिती मकरंद आबांकडून घेतली.

प्रत्येक वर्षी दिवाळीला बारामतीत गोविंद बागला जाऊन खासदार शरद पवार Sharad Pawar यांना शुभेच्छा देण्याचा पायंडा राष्ट्रवादीच्या नेत्यांत पडला आहे. अगदी लहानात लहान कार्यकर्त्यांपासून ते आमदार, खासदार, मंत्र्यांपर्यंतचे सर्व राष्ट्रवादीचे नेते पवार साहेबांना भेटून शुभेच्छा देतात. पण, राष्ट्रवादीच्या NCP दुफळीनंतरही ही परंपरा बहुतांशी आमदारांनी पाळली असल्याचे चित्र आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार गट राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांनी आज गोविंद बागेत जाऊन खासदार शरद पवार यांची भेट घेतली. तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, शामराव गाडवे, मुंबई बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर हे उपस्थित होते. Maharashtra Political News

यावेळी खासदार शरद पवार यांनी वाई तालुक्यातील किसन वीर कारखाना, खंडाळा कारखाना यांच्या गाळपाची स्थिती, तसेच त्यासंदर्भातील काही प्रश्नांची माहिती मकरंद पाटील यांच्याकडून घेतली. तसेच मराठा आरक्षणावर ही साताऱ्यातील नेमक्या स्थितीची माहिती श्री. पवार यांनी घेतली. दाोन्ही नेत्यांत सुमारे पाऊण तास विविध समस्याबाबत चर्चा झाली.

Edited By : Umesh Bambare

Makrand Patil, Sharad pawar, Nitin Patil, Shamrao Gadve
Satara Political News : कृष्णेच्या पाण्याची चोरी; स्वाभिमानी शेतकरी घेणार जलसमाधी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com