Assembly Monsoon Session : कर्जमाफीतून शेतकरी सातबारा कोरा करा : शशिकांत शिंदेंचा अधिवेशनात आवाज

Shashikant Shinde आमदार शशिकांत शिंदे म्हणाले,"तीन महिने झाले, तरी शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अजून मिळाली नाही.
Dhananjay Munde, Shashikant Shinde
Dhananjay Munde, Shashikant Shindesarkarnama
Published on
Updated on

-राजेंद्र वाघ

Assembly Monsoon Session : तीन महिने झाले, तरी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची १७ कोटी चार लाख एक हजार रुपये एवढी भरपाई अद्याप मिळालेली नाही. राज्यातील एक लाख ९५ हजार शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी. त्याचबरोबर थकबाकीदार शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत केली आहे.

विधान परिषदेत २६० अन्वये चर्चेत सहभाग घेताना आमदार शिंदे Shashikant Shinde म्हणाले,"तीन महिने झाले, तरी शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अजून मिळाली नाही. सातारा Satara जिल्ह्यामध्ये १७ कोटी चार लाख एक हजार रुपये, एवढी भरपाई अजूनही मिळाली नाही आणि राज्यातील एक लाख ९५ हजार शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

जसे खासदार शरद पवार Sharad Pawar यांनी ७५ हजार कोटींची कर्जमाफी करून इतिहास घडवला. त्याच पद्धतीने महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळात अजित पवार यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या बाबतीत सुतोवाच केले होते. आता बँकेच्या कर्जाची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन सरकारने उत्तरामध्ये द्यावे.

ऊर्जानिर्मितीसाठी आधी पवनचक्की आणल्या. मग ते परवडत नाही, म्हणून सौरऊर्जा आणली. त्यावेळेस अजित पवार यांच्याकडे ऊर्जा खाते होते. तेव्हा त्यांनी जेवढी वसुली होईल. त्यामधील काही रकमेची राज्य सरकारकडे, जिल्ह्याला, तालुक्याला देण्याची विभागणी केली होती. मात्र, आज काय परिस्थिती आहे, सरकारने ते पैसे राज्याकडे वळवून घेतले. शेतीपंपांसाठी पुरेशी वीज उपलब्ध व्हावी, यासाठी स्वतंत्र डीपी मिळाव्यात, ही शेतकऱ्यांची पहिली मागणी आहे.’’

Dhananjay Munde, Shashikant Shinde
Satara BJP News : जागा वाटपाच्या तिढ्यावर आमदार गोरेंनी स्पष्टच सांगितले...

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम केलेल्या कंत्राटदारांना पैसे मिळाले नाहीत. उलट कामाच्या संदर्भात पुन्हा निविदा काढण्यात आल्या आणि त्याठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर अधिकाराचा गैरवापर होता कामा नये. ज्या पद्धतीने सापशिडीचा खेळ सुरू आहे, तो बघितल्यानंतर लोकशाहीवर विश्वास राहणार नाही, अशा शब्दांत आमदार शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com