मकरंद पाटील यांचेच शिलेदार ठरले लोणंदचे कारभारी...

लोणंदच्या Lonand जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसवर NCP विश्वास व्यक्त करत बहुमताने सत्ता देण्याच्या आवाहनाला साथ देत १७ पैकी १० जागा निवडून देत पक्षाला बहुमत दिले.
Madhumati Palange, Makrand Patil, Shivajirao Shelke-patil
Madhumati Palange, Makrand Patil, Shivajirao Shelke-patillonand Reporter
Published on
Updated on

लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुमती सागर पलंगे ( गालिंदे) व उपनगराध्यक्षपदी शिवाजीराव शंकरराव शेळके - पाटील यांची १० विरूध्द सात मतांनी निवड झाली. दोन्ही पदाधिकाऱ्यांना सव्वा वर्षे संधी मिळणार आहे.

लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात आज ( ता. १०) नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूकीसाठी नवनिर्वाचित सर्व १७ सदस्य उपस्थित होते. सुरुवातीला नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुमती सागर पलंगे (गालिंदे) यांना दहा तर काँग्रेसच्या दिपाली निलेश शेळके यांना सात मते पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुमती पलंगे या १० विरुद्ध सात मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.

Madhumati Palange, Makrand Patil, Shivajirao Shelke-patil
मकरंद पाटील यांच्या मतदारसंघाबाबत जयंत पाटलांची मोठी घोषणा

सौ.पलंगे यांच्या बाजूने राष्ट्रवादीच्या शिवाजीराव शेळके - पाटील, भरतसाहेब शेळके, सचिन शेळके, रवींद्र क्षीरसागर, गणीभाई कच्छी, भरत बोडरे, सुप्रिया शेळके, सीमा खरात, रशीदा इनामदार आदी दहा नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. तर काँग्रेसच्या दिपाली निलेश शेळके यांच्या बाजूने काँग्रेसचे आसिया बागवान, प्रविण व्हावळ, भाजपच्या दिपाली संदीप शेळके, तृप्ती घाडगे, ज्योती डोणीकर तर अपक्ष राजश्री शेळके आदी सात नगरसेवकांनी मतदान केले.

Madhumati Palange, Makrand Patil, Shivajirao Shelke-patil
लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुन्हा निर्विवाद सत्ता,पाहा व्हिडिओ

उपनगराध्यक्षपदासाठी राष्टूवादी काँग्रेसच्या वतीने शिवाजीराव शेळके - पाटील व भाजपच्या वतीने दिपाली संदीप शेळके यांनी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये राष्टूवादीचे शिवाजीराव शेळके - पाटील यांच्या बाजूने दहा तर काँग्रेस - भाजप आघाडीच्या दिपाली शेळके यांना सात मते पडल्याने राष्ट्रवादीचे शिवाजीराव शेळके - पाटील हे १० विरुद्ध सात मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. शिवाजीराव शेळके - पाटील यांना राष्ट्रवादीच्या दहा नगरसेवकांनी तर भाजपच्या दिपाली संदीप शेळके यांना भाजपच्या तीन, काँग्रेसच्या तीन व एक अपक्ष आदी ७ नगरसेवकांनी मतदान केले.

Madhumati Palange, Makrand Patil, Shivajirao Shelke-patil
खंडाळा कारखाना निकाल : मकरंद आबांच्या माथी विजयासह कर्जाचा गुलाल

या निवडीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजीराव जगताप व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांनी नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. तसेच आमदार मकरंद पाटील यांनीही नगरपंचायतीच्या सभागृहात उपस्थित राहून नूतन नगराध्यक्ष सौ. पलंगे- गालिंदे व व उपनगराध्यक्ष श्री. शेळके -पाटील यांचा सत्कार करून त्यांच्या दालनात जावून त्यांच्याकडे पदभार सुपूर्त केला. या निवडीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत फटाक्याची आतिशबाजी व गुलालाची उधळण केली.

Madhumati Palange, Makrand Patil, Shivajirao Shelke-patil
सातारा लोडशेडिंगमुक्त होण्यासाठी पहिले पाऊल पडले...

लोणंदच्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास व्यक्त करत बहुमताने सत्ता देण्याच्या आवाहनाला साथ देत १७ पैकी १० जागा निवडून देत पक्षाला बहुमत दिले. आजची निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. मात्र, निवडणूक झाली. निवडणुकीदरम्यान पक्षाने येथील जनतेला शहराच्या सर्वांगिण विकासाचा दिलेला शब्द निश्चितपणे पाळला जाईल. येथील सर्व प्रश्न सोडवून लोणंद शहराचा सर्वांगीन विकास साधून या शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखवू.

- मकरंद पाटील (आमदार, वाई-खंडाळा-महाबळेश्वर)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com