Congress News : पृथ्वीराज चव्हाणांना निकटवर्तीयाने दाखविला कात्रजचा घाट; काँग्रेसचा राजीनामा, भाजपप्रवेश निश्चित

Manohar Shinde Resign Congress : माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार अतुल भोसले यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पक्की झाली आहे.
Prithviraj Chavan-Manohar Shinde
Prithviraj Chavan-Manohar ShindeSarkarnama
Published on
Updated on
  1. मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय मनोहर शिंदे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला, ज्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुष्टी मिळाली आहे.

  2. शिंदे यांनी पक्षाशी निष्ठा राखत अनेक वर्षे काम केले असून, त्यांनी मलकापूरमधील विकासकामांमुळे आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

  3. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतल्यानंतर, शिंदे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Karad, 07 November : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आणि कॉंग्रेसच्या कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष राहिलेले मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी गुरूवारी (ता. ०६ नोव्हेंबर) काँग्रेस सदसत्वाचा राजीनामा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्ष रणजीत देशमुख यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून शिंदे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळणार असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्यासमवेत भेटल्याने त्यांचा भाजपतील प्रवेश निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

मनोहर शिंदे (Manohar Shinde) यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे. पक्षाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे वेळोवेळी पार पाडल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही काम करण्याची संधी पक्षाने मला दिली. पक्षाप्रति मीही प्रामाणिक राहत आजवर निरपेक्ष भावनेने काम पाहिले.

माझे वडील स्वातंत्र्यसैनिक दिवंगत भास्करराव शिंदे यांनी माजी केंद्रीय मंत्री दिवंगत आनंदराव चव्हाण आणि प्रेमलाताई चव्हाण यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली सार्वजनिक जीवनात काम केले आहे. काँग्रेस पक्षाने (Congress Party) त्यांना नवी ओळख निर्माण करुन दिली. याच पक्षाच्या माध्यमातून मिळालेली सत्ता हे समाजसेवेचे साधन मानून मलकापूरसारख्या ठिकाणी काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

मलकापूरला २४ तास मीटरने नळ पाणीपुरवठा योजना राबवून राज्यातच नव्हे; तर देशात मलकापूरची ओळख निर्माण केली. माझ्या वडिलांच्या पश्चात त्यांच्या विधायक आणि राजकीय कार्याचा वारसा म्हणून मी काम करण्याचा आजवर प्रामाणिक प्रयत्न केला.

Prithviraj Chavan-Manohar Shinde
Anna Bansode : अजितदादांनी अण्णा बनसोडेंवर सोपवली आणखी एक जबाबदारी; भरणेंसोबत आखणार सोलापुरातील विजयाची गणिते

ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक जीवनात-राजकारणात मार्गक्रमण करत असताना मलकापूरसारख्या निमशहरी भागात विविध विकास कामे करीत असताना नागरिकांच्या हिताचे काही अभिनव विकास उपक्रम राबवले. ते केवळ राज्यातच नव्हे; तर देशातही मानदंड ठरले.

मी या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाप्रति सदैव कृतज्ञ असेन. सध्याच्या काही अपरिहार्य परिस्थितीमुळे मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे असे मनोहर शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे, त्यामुळे शिंदे यांचा भाजपमधील प्रवेश निश्चित मानला जात आहे.

Prithviraj Chavan-Manohar Shinde
Laxman Hake : आमच्याकडं माणसं नाहीत का? तू आरं तुरं बोलू नको : पंढरपुरात हाके अन्‌ मराठा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राडा, एकमेकांच्या अंगावर धावून गेले

Q1. मनोहर शिंदे यांनी कोणत्या पक्षाचा राजीनामा दिला?
A1. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

Q2. शिंदे कोणत्या नेत्यांचे निकटवर्तीय आहेत?
A2. ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत.

Q3. मनोहर शिंदे यांचा कोणत्या पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे?
A3. ते भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत.

Q4. त्यांनी राजीनामा का दिला?
A4. काही अपरिहार्य परिस्थितीमुळे त्यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याचे पत्रात नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com