Bribe : माण बाजार समितीचा सचिव लाचलुचपतच्या जाळ्यात

कृषी उत्पन्न बाजार समिती Krushiutpanna Bajar Samiti उपबाजार म्हसवड Mhaswad येथील गाळा भाड्याने मिळावा यासाठी तक्रारदाराने सचिव रमेश जगदाळे यांच्याकडे मागणी केली होती.
Bribery in Maan
Bribery in MaanSarkarnama
Published on: 
Updated on: 

दहिवडी : गाळा भाड्याने देण्याकरिता मागितलेली लाच स्वीकारताना माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा सचिव रमेश रामभाऊ जगदाळे (वय : ५६ वर्षे, रा. राणंद, ता. माण) हा लाचलुचपतच्या सापळ्यात सापडला आहे. वारंवार होणाऱ्या लाचलुचपतच्या कारवायांनी माणचे प्रशासन हादरले आहे.

याबाबतची माहिती अशी, कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार म्हसवड येथील गाळा भाड्याने मिळावा यासाठी तक्रारदाराने सचिव रमेश जगदाळे यांच्याकडे मागणी केली होती. सदरचा गाळा भाड्याने देण्याकरिता रमेश जगदाळे यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.

याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यावर लाचलुचपत विभागाकडून आज सापळा लावण्यात आला होता. या सापळ्यात लाच रक्कम स्विकारताना रमेश जगदाळे अलगद सापडला. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली साताराचे पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिस निरीक्षक सचिन राऊत, पोलिस नाईक विनोद राजे व संभाजी काटकर यांनी सहभाग घेतला.

Bribery in Maan
Satara : सातारा पालिकेत दीपक पवारांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे पॅनेल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com