-विशाल गुंजवटे
Maan BJP News : कॅनॉल नादुरुस्त झाल्याने थांबविण्यात आलेले माण तालुक्यातील उरमोडी आणि तारळीच्या पाण्याचे आवर्तन येत्या गुरुवारपासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर खटाव तालुक्यातील मागणी असलेल्या भागालाही पुन्हा पाणी देण्यात येणार असल्याची माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.
उरमोडी आणि तारळी प्रकल्प अधिकाऱ्यांबरोबर दहिवडी येथे झालेल्या बैठकीनंतर आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore बोलत होते. पावसाने पाठ फिरवल्याने माणमध्ये पाण्याचे Maan दुर्भिक्ष निर्माण झाले आहे.खटाव तालुक्याचे आवर्तन झाल्यानंतर माणमध्ये पाणी नेताना कॅनॉल नादुरुस्त झाल्याने आवर्तन थांबविण्यात आले होते. हे आवर्तन लवकर सुरु करण्याच्या सुचना आमदार जयकुमार गोरे यांनी दिल्या.
खटावलाही आणखी पाणी मिळणार ....
खटाव आणि माणला प्रत्येकी २२ दिवसांचे आवर्तन होते. खटावचे आवर्तन संपवून माणमध्ये पाणी नेताना कॅनॉल नादुरुस्त झाल्याने आवर्तन थांबवावे लागले होते. आता माणमधील आवर्तन संपल्यावर मागणी असलेल्या खटावमधील भागालाही पुन्हा पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे असे आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले.
बैठकीत ठरल्याप्रमाणे गुरुवार (ता. तीन ) ऑगस्टपासून आठ तारखेपर्यंत तारळीचे आवर्तन पळसावडे, देवापूर, शिरताव, पुळकोटी, बनगरवाडी, वरकुटे मलवडी तर उरमोडीचे आवर्तन पिंपरी, मनकर्णवाडी, पानवण,गंगोती,पुळकोटी, हांगेवस्ती, पळशी, ढाकणी,नागोबा देवस्थान.
नऊ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट तारळीचे आवर्तन जांभुळणी, गंगोती,पानवण,वळई तर उरमोडीचे आवर्तन वाकी, गोंदवले बुदृक,वाघमोडेवाडी, पिंगळी खुर्दला सोडण्यात येणार आहे. १४ ते २२ ऑगस्ट उरमोडीचे आवर्तन मनकर्णवाडी, वाकी, पळशी, गोंदवले खुर्द,( लोधवडे )या भागात सोडण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.