
कराड : सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे मानसिंगराव जगदाळे या निवडणुकीच्या मैदानातूनच बाहेर पडले आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जगदाळे यांचा अर्ज यापूर्वी बाद ठरवला होता. तोच निकाल प्रादेशिक साखर सहसंचालकांनीही कायम ठेवला आहे.
जवळपास 60 हजार सभासद असणाऱ्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांची मागील अनेक वर्ष एक हाती सत्ता आहे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. त्यापाठोपाठ कारखान्यातूनही त्यांना घरी बसवण्यासाठीचे जोरदार नियोजन सुरू आहे. त्यासाठी काँग्रेस आणि भाजपही एकत्र आले आहेत.
अशात अर्ज दाखल केल्यानंतर सत्ताधारी पॅनेलमधील मानसिंगराव जगदाळे, विरोधी पॅनेलमधील निवास थोरात यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली होती. त्यावरील निकाल देताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या दोघांचे आणि अन्य कारणांमुळे 27 असे तब्बल 29 अर्ज छाननीत बाद केले. त्यात थोरात आणि जगदाळे यांच्यासह 10 जणांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे अपील केले. त्याचा निकाल लागला आहे.
यात त्यात थोरात यांच्यासह नऊ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर जगदाळे यांचा अर्ज अवैधच राहिला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना धक्का बसला आहे. जगदाळे यांच्याकडे अपिलासाठी आता उच्च न्यायालयाचाच पर्याय आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासाठीची कार्यवाही करण्यासाठी त्यांना काही दिवसांची मुदत दिली आहे.
दरवेळी एकहाती सत्ता जिंकणाऱ्या बाळासाहेब पाटील यांच्यासाठी यंदाची निवडणूक अवघड मानली जात आहे. त्यातच यावेळी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळपर्यंत 201 अर्ज शिल्लक राहिले होते. शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. आता या मुदतीत आणखी किती अर्जदार माघार घेणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.