

Mangalvedha, 09 February : सोलापूर जिल्हा परिषद आणि मंगळवेढा पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्हा परिषदेच्या चारही गटांत भाजपचे, तर पंचायत समितीचे सहा गण जिंकले आहेत. उर्वरीत दोन गणात तीर्थक्षेत्र विकास आघाडीने विजय संपादन केला आहे. आवताडेंनी दुसऱ्यांदा पंचायत समितीवर वर्चस्व राखले.
दरम्यान, रड्डे पंचायत समिती गणामध्ये तीर्थक्षेत्र आघाडीचे सुरेश कांबळे यांनी भाजपचे उमेदवार माजी सभापती दत्तात्रेय कांबळे यांचा 391 मतांनी विजय मिळविला आहे. या विजयामुळे सुरेश कांबळे यांनी २५ वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे. तब्बल २५ वर्षांनंतर कांबळे यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.
मंगळवेढा पंचायत समितीच्या २००२ च्या निवडणुकीत दत्तात्रेय कांबळे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, तर त्यांच्या विरोधात सुरेश कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रड्डे गणातून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत दत्तात्रेय कांबळे काँग्रेसकडून यांनी सुरेश कांबळे हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंगळवेढा पंचायत समितीच्या रड्डे पराभव केला होता. त्या निवडणुकीतील पराभवाचा सुरेश कांबळे यांनी वचपा काढला आहे.
जिल्हा परिषदेच्या 4 व पंचायत समितीच्या 8 जागांची मंगळवेढा शहरातील शासकीय गोदामात मतमोजणी करण्यात आली. दामाजी नगर गटातून भाजपचे रमेश भांजे हे 1382 मतांनी विजयी झाले आहेत. भांजे यापूर्वी पंचायत समिती सदस्य होते. या गटातील दामाजी नगर गणात जयश्री शिंदे यांनी आघाडीच्या उमेदवाराचा 348 मतांनी पराभव केला.
बोराळे पंचायत समिती गणात भाजपच्या जयश्री कवचाळे या 2 हजार 135 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य चिटणीस लतीफ तांबोळी यांच्या कन्या सुमैया तांबोळी हिचा पराभव केला आहे.
हुलजंती गटात संगीता दुधाळ ह्या भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या आहेत. त्यांनी 7 हजार 147 मतांनी विजय मिळविला. दुधाळ ह्यांनी गत महिन्यात भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती. मरवडे पंचायत समिती गणात मोहिनी गणपाटील या 1399 मतांनी, तर हुलजंती पंचायत समिती गणामध्ये मल्लिकार्जुन मल्लाळे 3767 मतांनी विजयी झाले आहेत.
भोसे जिल्हा परिषद गटात माजी सभापती प्रदीप खांडेकर हे 1298 मतानी विजयी झाले आहेत. नंदेश्वर गावात खांडेकर यांना मिळालेले 1214 चे मताधिक्य त्यांच्या विजयाचा की फॅक्टर ठरला आहे. पंचायत समिती रड्डे गणामध्ये तीर्थक्षेत्र आघाडीचे सुरेश कांबळे हे 391 मतांनी विजयी झाले आहेत, त्यांनी माजी सभापती दत्तात्रेय कांबळे यांचा पराभव केला. भोसे पंचायत समिती गणात डॉ. आप्पासाहेब निकम हे 342 मतांनी विजयी झाले आहेत.
लक्ष्मी दहिवडी गटात राष्ट्रवादीच्या उमेदवार कोमल ढोबळे यांचा पराभव झाला. त्या ठिकाणी भाजपच्या करूणा शिवशरण यांनी 5625 मतांनी विजयी मिळवला आहे. या गटात कविता खडतरे यांनी 5546 मते घेतली, त्यामुळे ढोबळे यांचा पराभव झाला. या गटातील चोखामेळा गणामध्ये संगीता लेंडवे या आघाडीच्या उमेदवाराने निवडणुकीपूर्वीच आपला पाठिंबा भाजपच्या दीपाली ताड यांना जाहीर केला होता. त्यानंतरही संगीता लेंडवे यांना 3262 पेक्षा अधिक मते मिळाली. लक्ष्मी दहिवडी पंचायत समिती गणमध्ये विनायक यादव हे 3598 मतानी विजयी झाले त्यांनी आघाडीच्या काका मोरे यांचा पराभव केला.
शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आबा लांडे यांना फक्त 340 इतकी मते मिळाली. पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे, त्यामुळे चोखामेळानगर, मरवडे आणि बोराळे या पंचायत समिती गणातून विजयी होणाऱ्या महिलांना सभापती पदाची संधी मिळणार आहे मात्र तिन्ही जागा या भाजपने पटकावल्यामुळे सभापती भाजपचा होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी पंचायत समितीचे पाच सदस्य विजय झाले होते. आता त्यामध्ये एका सदस्याची भर पडून सहा सदस्यांची संख्या झाली आहे. जिल्हा परिषदेचे तीन सदस्य विजयी झाले होते, त्यामध्ये आणखी एका सदस्याची भर टाकत वर्चस्व कायम ठेवले. निकालानंतर विजयी उमेदवाराने गुलालाची उधळण व फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.
मंगळवेढ्यातील पक्षीय बलाबल
दामाजीनगर गट
रमेश भांजे विजयी भाजप 12930, महाविर ठेंगील 11547
-----
दामाजी नगर पंचायत गण
जयश्री शिंदे 5646 विजयी तिर्थक्षेत्र विकास आघाडी,सविता कोकरे 5298
------
बोराळे पंचायत समिती गण
जयश्री कवचाळे 6825 विजयी भाजप, सुमैया तांबोळी 4690 सारिका दसाडे 2066
............................................
हुलजंती गट
संगीता दुधाळ 17717 विजयी भाजप, जयश्री माने 10570
---
हुलजंती पंचायत समिती गण
मल्लिकार्जुन मल्लाळे 8709 विजयी भाजप,महादेव पेटर्गे 4942
मरवडे पंचायत समिती
मोहिनी गणपाटील 7944 विजयी भाजप,उन्नती पवार 6545.
...................................
लक्ष्मी दहिवडी गट
करूणा शिवशरण 12740 विजयी भाजप, कोमल ढोबळे 7903, कविता खडतरे 5546
---
चोखामेळानगर पंचायत समिती दिपाली ताड 8887 विजयी भाजप संगिता लेडवे 3262
----
लक्ष्मी दहिवडी पंचायत गण विनायक यादव 8407 विजयी भाजप, काकासाहेब मोरे 4809 आबा लांडे 340
................................................
भोसे जिल्हा परिषद गट
प्रदीप खांडेकर 15908 विजयी भाजप बसवराज पाटील 14610
-----
रड्डे पंचायत समिती गण
सुरेश कांबळे 7333 विजयी तिर्थक्षेत्र विकास आघाडी दत्तात्रय कांबळे 6942
-----
भोसे पंचायत समिती गण
आप्पासाहेब निकम 8021 विजयी भाजप, प्रवीण मेटकरी 7679 काँग्रेस
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.