Mangalwedha News : मंगळवेढ्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू; पहिल्याच दिवशी वेबसाइटचा 'खोडा'

Gram Panchayat Election News : संकेतस्थळ बंद असल्यामुळे इच्छुकांची निराशा...
Gram Panchayat Election News
Gram Panchayat Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Mangalwedha News : महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडत असतानाच आता २ हजार ३६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची धुरळा उडणार आहे. या निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्य पदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे.

याचदरम्यान, आता मंगळवेढा(MangalWedha ) तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सोमवारपासून सुरू झाली असताना पहिल्याच दिवशी निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ बंद असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना आपल्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे पहिल्याच दिवशीच संकेतस्थळ बंद असल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला.(Gram Panchayat)

Gram Panchayat Election News
Gopichand Padalkar News : 'महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती भांडणं लावणारा लांडगा कोण'; पडळकरांची पवारांवर टीका

तालुक्यातील आंधळगाव, नंदूर, लक्ष्मी दहिवडी, खुपसंगी, रड्डे, खडकी, बठाण, मुंढेवाडी, हिवरगाव, महमदाबाद हु, अकोला, शेलेवाडी, डिकसळ, जालीहाळ, लोणार, मानेवाडी, शिरसी, जंगलगी, रेवेवाडी, पडोळकरवाडी, देगाव, उचेठाण, निंबोणी, चिक्कलगी, जुनोनी, ब्रम्हपुरी,भाळवणी, तर बालाजीनगर या एकमेव ग्रामपंचायतची पोटनिवडणूक होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून(State Election Commission) मागील अनेक वर्षे ग्रामपंचायती निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यामुळे ग्रामपंचायतचा गावगाडा प्रशासकाच्या हातात दिला आहे. परंतु, प्रशासकाला त्याचे दैनंदिन कामकाज करून ग्रामपंचायतचे कामकाज करताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या या भूमिकेबद्दल ग्रामस्थातून तीव्र नाराजीला सामोरे जात असतानाच ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

त्यामध्ये 16 ते 20 ऑक्टोबर या पाच दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. हा कालावधी कमी असल्यामुळे या निवडणुकीसाठी इच्छुक असणारे उमेदवार अर्ज संकेतस्थळावर भरण्यासाठी गर्दी करून आहेत. मात्र, हे संकेतस्थळ बंद असल्यामुळे अनेक इच्छुकांची सध्या सोमवारी पहिल्याच दिवशी निराशा झाली.

मंगळवेढ्याचे तहसीलदार मदन जाधव म्हणाले, हे संकेतस्थळ बंद असल्याने इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अडचणी येत असल्यामुळे वरिष्ठांना कळविण्यात आले आहे.

Gram Panchayat Election News
Manoj Jarange Patil News : वेळ पडली तर आरक्षणासाठी मराठा, धनगर अन् मुस्लिम..., जरांगे यांचे सूचक वक्तव्य

संभाव्य इच्छुक उमेदवार बिरुदेव घोगरे म्हणाले, उमेदवारी अर्ज दाखल करावयाचा कालावधी कमी असल्यामुळे वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही सकाळपासून ऑनलाइन सेंटरवर थांबलो आहे. हे संकेतस्थळ सुरू नसल्यामुळे आम्हाला उमेदवारी अर्ज भरता येणार येत नाही, आला नाही त्यामुळे मुदतवाढ मिळावी.

(Edited By Deepak Kulkarni)

Gram Panchayat Election News
Manoj Jarange Patil Vs Bhujbal : मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा भुजबळांना डिवचलं; म्हणाले, " धमकी द्यायला काय ते...?"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com