Gopichand Padalkar News : 'महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती भांडणं लावणारा लांडगा कोण'; पडळकरांची पवारांवर टीका

Gopichand Padalkar On Dhangar Reservation : मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात वातावरण तापलं असताना धनगर आरक्षणाचा मुद्दाही पेटला आहे. गोपीचंद पडळकर हे आक्रमक झाले आहेत.
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on

Solapur Politics News : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात जाती-जातींमध्ये भांडणं लावणारा लांडगा कोण? हे सर्वांना माहिती आहे, असं म्हणत पडळकरांनी नाव न घेता शरद पवारांवर टीका केली आहे.

Gopichand Padalkar
Sadabhau Khot News : फडणवीसांना दाबण्यासाठी राज्यातील राजकारण्यांची घुसळण : सदाभाऊ खोत

'महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती लांडगा कोण आहे. कोण लांडगा महाराष्ट्रात भांडणं लावतो. कोणत्या लांडग्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तुकडे तुकडे केले, कुठल्या लांडग्याने बी. के. कोकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला.

धनगरांना एसटी आरक्षण अपेक्षित असताना एनटीचा दाखला दिला. हे कुठल्या लांडग्याने केलंय? तुम्ही आमच्या मेंढपाळाला विचारा. तो त्या लांडग्याचं नाव सांगेल', अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचं नाव न घेता केली.

'मागे माझ्यावर दोन वेळा हल्ले झाले. एक सोलापूर जिल्ह्यातच झाला. भला मोठा दडग माझ्या गाडीवर टाकण्यात आला. मी जे काम करतोय ते धनगर समाज, भटके समाज आणि बहुजन समाजासाठी काम करतोय. मी धनगर समाजाची जागर यात्रा काढली आहे. धनगर समाजाची लोकसंख्या मोठी आहे, हे प्रस्थापितांना माहिती आहे.

हा समाज एकदा जागा झाला तर आपल्या स्पर्धेत येऊ शकतो. आणि म्हणून हे थांबवायचं असेल तर गोपीचंदला थांबवलं पाहिजे. त्यामुळे काहीही होऊ शकतं. मात्र, काहीही झालं तरी धनगर आरक्षणाची चळवळ ही थांबता कामा नये. एसटी आरक्षणाचा दाखला मिळत नाही तोपर्यंत कोणी शांत झोपू नये, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

धनगर यात्रेसाठी गोपीचंद पडळकर हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील विझोरीमध्ये आले होते. या वेळी धनगर जागर यात्रेची सकाळी १० वाजता सभा झाली. या यात्रेला मोठ्या संख्येने धनगर समाजाने उपस्थिती लावली होती.

आपल्याला काहीही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय सोडायचं नाही. धनगर समाजाचा आरक्षणाचा लढा हा शेवटच्या टप्प्यात आहे. आमच्या हक्काचे आरक्षण हे लवकरच मिळेल, असा विश्वास पडळकर यांनी व्यक्त केला.

Gopichand Padalkar
Thackeray Group leader : कोल्हापूरच्या निष्ठावंत शिवसैनिकाला उपनेतेपद; 'मातोश्री'ने सोपवली मोठी जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com