Manoj Jarange Patil News : वेळ पडली तर आरक्षणासाठी मराठा, धनगर अन् मुस्लिम..., जरांगे यांचे सूचक वक्तव्य

Maratha Reservation News : आरक्षणाचा विषय सध्या संपूर्ण राज्यातच चर्चेत आहे.
Manoj Jarange- Patil Rally News
Manoj Jarange- Patil Rally NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आरक्षणाचा विषय सध्या संपूर्ण राज्यातच चर्चेत आहे. एकीकडे मराठा समाज मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणासाठी एकवटला आहे. दोन दिवसांपूर्वीच जरांगे यांनी राज्य सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम दिला.

धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने करतो आहे आणि आपल्या मागण्या सरकारपुढे मांडतो आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वेळ पडली तर आरक्षण मिळविण्यासाठी मराठा, धनगर आणि मुस्लिम एकत्र येतील, असे सूचक वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सोमवारी (ता. 16) 'सकाळ माध्यम समूहा'तील विविध आवृत्तीच्या संपादकांशी मनमोकळा संवाद साधला आणि विविध प्रश्नांवर अगदी दिलखुलास उत्तरे दिली.

याचवेळी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना जरांगे यांनी आरक्षणासाठी येत्या काळात काय होऊ शकते, याबद्दल मत मांडले.आम्हाला सगळ्यांनाच आमच्या मुलाबाळांसाठी लढावे लागेल. मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाच्या भावना सगळ्यांपुढे स्पष्ट आहेत. त्यासाठी येत्या काळात काहीही घडू शकते.

Manoj Jarange- Patil Rally News
Manoj Jarange Patil News : मी खरंच बारावीपर्यंतच शिकलोय का ? याचा अनेकजण शोध घेताहेत...

सध्यातरी आम्ही सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आता माघार नाही, असे जरांगे यांनी सांगितले. सरकारला आम्ही 40 दिवसांचा वेळ दिला होता. त्यातले 30 दिवस उलटून गेले आहेत. आता फक्त दहा दिवस उरले आहेत.

सरकारने 24 ऑक्टोबरच्या आत निर्णय घेतला पाहिजे आणि सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले पाहिजे. यासाठी एनटी, व्हीजेएनटी यांच्याप्रमाणे वेगळा प्रवर्ग करता आला तरी चालेल, पण आम्हाला टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे, याचा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.

मराठा (Maratha Reservation) आंदोलनात फूट पडेल का, यावर बोलताना त्यांनी तळागाळात काम करताना आम्ही सगळे एकत्र आहोत. कोणी कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडत नाही. आमच्यामध्ये फूट पाडू शकेल, अशी शक्तीच आता अस्तित्वात नाही, असे सांगितले.

सरकारला (State Government) अल्टिमेटम दिल्यानंतर अद्यापही आमची त्यांच्याशी कोणतीच चर्चा सुरू झालेली नाही. उलट आमच्या सभेवेळी तिथे इंटरनेट तोडण्यात आले. आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचा काहीच उपयोग झाला नाही, असेही त्यांनी सांगितले.

मी कोणत्याच राजकीय पक्षाला किंवा नेत्याला घाबरत नाही. मला कोणत्याच पक्षाबद्दल रागही नाही.,पण राजकारणी जसे वेळोवेळी रंग बदलतात. त्यामधून मी खूप काही शिकलो आहे आणि आता त्यांना सळो की पळो करून सोडणार; पण शांततेच्या मार्गाने, अशी मनातील भावनाही त्यांनी व्यक्त केली.

Edited by : Amol Jaybhaye

Manoj Jarange- Patil Rally News
Manoj Jarange Patil Vs Bhujbal : मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा भुजबळांना डिवचलं; म्हणाले, " धमकी द्यायला काय ते...?"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com