Mangesh Chivate to Contest MLC Poll from Pune Teachers’ Constituency
Mangesh Chivate to Contest MLC Poll from Pune Teachers’ ConstituencySarkarnama

ShivSena News : एकनाथ शिंदेंच्या 'मंगेशाची' आमदारकीसाठी मोर्चेबांधणी; चिवटेंना हवा 'गुरुजींचा' आशीर्वाद

ShivSena News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करत आहेत.
Published on

ShivSena News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी आता आमदारकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघातून सध्या त्यांची चाचपणी सुरु आहे. या निवडणुकीला अजून दीड वर्षाचा कालावधी असला तरी आतापासूनच त्यांनी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये शिक्षकांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे.

2 आठवड्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्याचा मेळावा पार पडला. आता 31 मे रोजी कोल्हापूरमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यात शिक्षकांसाठी मेळावा घेतला जाणार आहे. यावेळी शिक्षकांच्या आरोग्याकडेही लक्ष दिले जात आहे. या शिक्षकांना कोणकोणत्या आरोग्य योजनांचा लाभ देता येऊ शकतो, याची माहिती दिली जात आहे.

पुणे शिक्षक मतदार मतदारसंघातून सध्या काँग्रेसचे जयंत पाटील आसगावकर हे आमदार आहेत. त्यांच्याविरोधात मागील वेळी भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांनी निवडणूक लढवली होती. आता भाजपच्या मतदारसंघात शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केल्याने आतापासूनच राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे पक्षातील मुख्य वर्तुळातून चिवटे यांना समर्थन मिळत आहे.

सोलापूरमध्ये पार पडलेल्या मेळाव्यात चिवटे यांचा व्यासपीठावरील सर्वांनी भावी आमदार असा उल्लेख केला. तसेच शिक्षक मतदारसंघातून त्यांची उमेदवारी जाहीर करण्याचा आग्रह केल्याचा उल्लेखही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चिवटे यांच्यावर अन्याय करणार नाहीत, असा विश्‍वास कदम यांनी व्यक्त केला. त्यामुळे चिवटे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानले जाते.

Mangesh Chivate to Contest MLC Poll from Pune Teachers’ Constituency
Ambadas Danve News : हॉटेल व्हिट्स लिलाव प्रक्रियेवर अंबादास दानवे यांचा आक्षेप! कुंपणच शेत खात असल्याचा महसूल प्रशासनावर आरोप

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेतर्फे शिक्षक मेळावा :

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने 31 मे रोजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार, शिक्षक मिळायच्या आयोजन करण्यात आले आहे. लोटस हॉल येथे सकाळी 10 वाजता कार्यक्रम होईल. राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षण संस्था पुरस्काराचे वितरण होणार आहे. राज्यातील 50 आदर्श संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित येणार आहे. यावेळी राज्यभरातून 2000 संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

Mangesh Chivate to Contest MLC Poll from Pune Teachers’ Constituency
Kamal Haasan: मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला! अभिनेता होणार खासदार! DMKकडून कमल हासन यांची उमेदवारी जाहीर

पुणे शिक्षक मतदार संघातील एकूण मतदार (जिल्ह्यानुसार) (2020)

पुणे :

पुरुष 15 हजार 807, स्‍त्री 16 हजार 371, इतर 23 (एकूण 32 हजार 201),

सातारा :

5 हजार 121, स्‍त्री 2 हजार 589 , इतर 1 (एकूण 7 हजार 711)

सांगली :

पुरुष 4 हजार 826, स्‍त्री 1 हजार 985, इतर 1 (एकूण 6 हजार 812 )

कोल्हापूर :

पुरुष 8 हजार 878, स्‍त्री 3 हजार 359, इतर 0 (एकूण 12हजार 237)

सोलापूर :

पुरुष 10 हजार 561, स्‍त्री 3 हजार 23, इतर 0 (एकूण 13हजार 584).

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com