
मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आमरण उपोषण करत असून आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे.
महाविकास आघाडीतील आमदार-खासदार, शिवसेना आमदारांनी भेट देत मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे.
कोल्हापूरचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला नवा राजकीय रंग दिला आहे.
Kolhapur News : मराठा आरक्षणासाठीच्या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. ते आमरण उपोषणावर बसले असून त्यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. त्यांच्या या आंदोलनास राज्यभरातून प्रतिसाद वाढत आहे.
दरम्यान महाविकास आघाडीतील आमदार आणि खासदार उपोषणस्थळी जाऊन जरांगे यांची भेट घेत आहेत. तसेच शिवसेनेचे आमदारही मराठा आरक्षणाला पाठिंबा देताना दिसत आहेत. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या एका आमदाराने देखील आज उपोषणस्थळी जाऊन जरांगे यांची भेट घेतली आहे. यामुळे जिल्ह्यात एकच चर्चेचा विषय ठरला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. राज्यातील अनेक आमदार, खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून यात भाजपच्याही एका आमदाराचा सहभाग आहे.
आमदार सुरेश धस यांनी आझाद मैदानावर जाऊन जरांगे यांची भेट घेतली. तसेच जरांगे यांच्या मागण्या जाणून घेत चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आपण सोमवारी (ता.1) चर्चा करून तोडगा काढण्यासंदर्भात विनंती करू असे आश्वासन दिले.
दरम्यान आता कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर जाऊन भेट घेतली आहे. त्यांनी भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या या लढाईला आपला पाठिंबा दिल्याचे कळत आहे.
त्यांच्याशी संपर्क केला असता या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती मिळू शकलेली नाही. शिवाजी पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला असून त्यांनी मध्यंतरी शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ गडहिंग्लज शहरात मोठा मोर्चा काढला होता.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदानात पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यांना मराठा आंदोलकांनी घेरले. त्यांची कार अडवली. 'शरद पवारांनी वाटोळं केलं' अशा घोषणा दिल्या. त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या देखील फेकल्या.
यामुळे आता राज्यभर नाराजी व्यक्त केली जात असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मराठा आंदोलकांनी सयंम ठेवावा असे आवाहन केले आहे.
तर जरांगे पाटलांनी आपल्याच कार्यकर्त्यांना जोरदार फटकारले आहे. त्यांनी, ‘कोणताही नेता आला तर त्यांना त्रास देऊ नका, तो आपला दुश्मन जरी असला तरी त्याला सन्मान द्या, असे म्हटले आहे.
प्र.१. मनोज जरांगे पाटील कुठे उपोषण करत आहेत?
उ. मुंबईतील आझाद मैदानावर ते आमरण उपोषण करत आहेत.
प्र.२. त्यांच्या आंदोलनाला कोण पाठिंबा देत आहे?
उ. महाविकास आघाडीचे आमदार-खासदार, शिवसेना आमदार आणि कोल्हापूरचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी पाठिंबा दिला आहे.
प्र.३. आंदोलन किती दिवस चालू आहे?
उ. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.