Hasan Mushrif : जरांगे-पाटलांनी नाव जाहीर करावंच; हसन मुश्रीफांचं थेट आव्हान

Manoj Jarange Mumbai Morcha : ट्रॅप केलं जात असल्याचा आरोप करणाऱ्या जरांगे-पाटलांनी त्यांची नावे उघड करावीत...
Hasan Mushrif, Manoj Jarange Patil
Hasan Mushrif, Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News :

मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे-पाटील यांनी आज अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे कूच केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच मनोज जरांगे-पाटील यांच्या एका आरोपाने सरकार अस्वस्थ झाले. त्याला कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर देताना थेट जरांगे-पाटलांना आव्हान दिले आहे

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळू नये, यासाठी मला ट्रॅप केले जात असल्याचा आरोप मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला. त्यावर कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी 'मनोज जरांगे-पाटील यांना कुणी ट्रॅप केलं, हे त्यांनी जाहीर सांगावं,' असे खुले आव्हान जरांगे-पाटलांना दिले आहे.

Hasan Mushrif, Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगे-सरकारमधील तणाव वाढला? चर्चेकडे पाठ, नेमकं काय घडलं?

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील आग्रही आहेत. यावर प्रतिक्रिया देताना मुश्रीफ म्हणाले की, मराठा समाजाचे समाधान होईल, अशा पद्धतीने आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. जरांगे-पाटील यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, त्यांनी चालू नये. एक आठवड्यात मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करू आणि पुढील निर्णय घेऊ, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात कोल्हापूरचे (Kolhapur) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वच्छता केली. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अनेक वर्षांपासून देशवासीयांची इच्छा होती की, अयोध्येत राममंदिर व्हावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली हे राम मंदिर तयार झाले आहे. मी रामाचा राम माझा अशी भावना सगळ्यांची आहे. कागलमध्ये 1 लाख लोकांना प्रसाद दिला जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

रोहित पवार आणि इडी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनावणीवर जयंत पाटील यांनी कोणती खबरदारी घेतली, हे मला माहीत नाही, असे मुश्रीफ म्हणाले. तसेच काही तथ्य नसेल तर रोहित पवार यांना दिलेल्या इडीच्या चौकशीतून समोर येईल, असे सांगत त्यांनी या विषयावर जास्त बोलणे टाळले.

(Edited by Avinash Chandane)

R...

Hasan Mushrif, Manoj Jarange Patil
Sanjay Raut : जरांगे-पाटलांचा राजकीय वापर; पंतप्रधान मोदी सावरकरांना विसरले..!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com