Uddhav Thackeray Meet Jalna : शरद पवार यांच्यापाठोपाठ उद्धव ठाकरे जालन्यात; ठाकरे गट आक्रमक आंदोलनाच्या तयारीत ?

Uddhav Thackeray Meet With Jalna Maratha Protesters : लाठीमारामुळे मराठा समाजात तणावाचं वातावरण निर्माण झालं
Uddhav Thackeray Meet Jalna
Uddhav Thackeray Meet JalnaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. विरोधकांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठोपाठ आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी सायंकाळी आंतरवाली सराटी येथे जाऊन आंदोलकाची भेट घेणार आहेत तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून, आता जागोजागी आंदोलन करण्याची तयारी सुरु केली आहे. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray Meet Jalna
Rohit Pawar On NCP Crisis : राष्ट्रवादीत वाढतेय रोहित पवारांची 'पॉवर'; विरोधी नेत्यांसोबत भेटीगाठी, सुळेंनी केले 'राष्ट्रीय प्रमोशन' ?

उद्धव ठाकरे शनिवारी संध्याकाळी अंबड आणि आंतरवाली सराटी गावांना भेट देणार आहेत. त्यासोबतच ते मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. शुक्रवारी पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे मराठा समाजात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांच्या लाठीमारात जखमी झालेल्या कार्यकर्त्यांनाही उद्धव ठाकरे अंबड शासकीय हॅास्पिटलमध्ये जाऊन भेटणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे सायंकाळी सहा वाजता विमानाने पोचल्यानंतर ते आपल्या वाहनाने अंबड आणि आंतरवाली सराटी गावांना भेट देणार आहेत.

Uddhav Thackeray Meet Jalna
Dr. Bharti Pawar News : केंद्रीय मंत्र्यांनीच दुष्काळाची मागणी केली, एकनाथ शिंदे मदत करतील का?

दरम्यान, आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाज भावना तीव्र झाल्या आहेत. या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज शनिवारी काही जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे. तर, विरोधकांनी या घटनेचा निषेध नोंदवत थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे फडणवीस यांच्या गृहखात्याचे अपयश असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच हा लाठीमार झाला असावा, असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.

Uddhav Thackeray Meet Jalna
Jalna Maratha Protest : जालना लाठीचाराचे नाशिकमध्ये पडसाद; 'गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या', आंदोलकांची मागणी !

दुसरीकडे मराठा संघटना आणि आंदोलकही शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर संतप्त झाले आहेत. यावर आता आंतरवाली येथून माजी खासदार व स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला इशारा दिला आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com