Maratha Reservation : मराठा-ओबीसी आरक्षण वादावर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे मोठे विधान

Maratha Obc Reservation Issue in Maharashtra Sushilkumar Shinde Reaction : आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी आमने-सामने आले असून, वादाला तोंड फुटले आहे...
Sushilkumar Shinde
Sushilkumar ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation In Maharashtra Latest News : महाराष्ट्रात काही महिन्यांपासून मराठा, धनगर आणि ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापले आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने आणि उपोषणे सुरू आहेत. आरक्षणावरून मराठा-ओबीसी वाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठे विधान केले आहे. श्रीमंतांनी आरक्षण घेऊ नये, असे मत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

Sushilkumar Shinde
Obc Melava : वडेट्टीवारांचा 6 दिवसांतच ‘यू टर्न’; हजारो ओबीसींचे फोन आल्याचे सांगत भुजबळांसोबत एकत्र येण्याचा निर्णय

आरक्षणावर काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे?

राज्यात सध्या आरक्षणावरून वाद सुरू आहे. यावर सुशीलकुमार शिंदे वैयक्तिक मत मांडले आहे. आपले मत पक्षापेक्षा वेगळे आहे, असे सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि जातीय व्यवस्थेवर काम करायचे, हे आपल्याला मान्य नसल्याचे ते म्हणाले.

आरक्षणाचा लाभ घेतलेल्यांनी आरक्षण सोडून दिले पाहिजे. श्रीमंतांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये, असे सांगत मराठा-ओबीस आरक्षण वादावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ओबीसींचे आरक्षण काढून मराठा समाजाला देऊ नये, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षणाचा शब्द दिला असेल, तर ते दिले पाहिजे. आरक्षण देताना ते कायद्याच्या चौकटीत कसे बसेल हे सरकारला ठरवायचे आहे. पण कोणाचे आरक्षण काढून दुसऱ्याला देऊ नये. यासाठी स्वतंत्र कायदा करावा. मात्र, गरजेपर्यंतच आरक्षणाचा उपयोग करावा आणि नंतर ते सोडून द्यावे. आर्थिक क्षमता असणाऱ्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये, असे स्पष्ट मत सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.

Sushilkumar Shinde
Ajit Pawar News : जरांगे विरुद्ध भुजबळ वादावर अजित पवार बोलले, 'आरक्षण मागण्याचा सगळ्यांना अधिकार पण...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com