Obc Melava : वडेट्टीवारांचा 6 दिवसांतच ‘यू टर्न’; हजारो ओबीसींचे फोन आल्याचे सांगत भुजबळांसोबत एकत्र येण्याचा निर्णय

Vijay Wadettiwar-Chhagan Bhujbal : ओबीसींसाठी आवश्यकता पडली तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली आहे.
Vijay Wadettiwar-Chhagan Bhujbal
Vijay Wadettiwar-Chhagan Bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अवघ्या सहा दिवसांतच ‘यू टर्न’ घेतला आहे. मंत्री छगन भुजबळ ज्या व्यासपीठावर असतील त्या व्यासपीठावर आपण जाणार नाही, असे वडेट्टीवार यांनी 19 नोव्हेंबरला जाहीर केले होते. मात्र, आज (ता. 25 नोव्हेंबर) त्यांनी आपली भूमिका पुन्हा बदलली आहे. मला गेल्या दोन दिवसांपासून हजारो ओबीसी बांधवांचे फोन, तसेच भुजबळ यांचाही फोन आला होता. त्यामुळे मी हिंगोलीच्या ओबीसी मेळाव्याला उपस्थित राहणार आहे, असे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी जाहीर केले. (Vijay wadettiwar's 'U Turn' within six days; Coming with Bhujbal on same platform)

हिंगोली येथे ओबीसींचा उद्या (ता. 26 नोव्हेंबर) मेळावा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या बदल्या भूमिकेचे दर्शन घडविले. छगन भुजबळ ज्या व्यासपीठावर असतील त्या व्यासपीठावर मी जाणार नाही, असे मी म्हटलं होतं. मला भुजबळ यांच्यासह हजारो ओबीसी बांधवांचे फोन आले. ओबीसींच्या हक्कासाठी आपल्यामध्ये एकी असल्याचे दिसले पाहिजे. आपल्यात फूट दिसू नये, अशी भूमिका नेतेमंडळींनी मांडली. आमच्या चुकीच्या भूमिकेमुळे ओबीसी समाजात वेगळा संदेश जाऊ नये, यासाठी मी हिंगोलीच्या मेळाव्याला जात आहे, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vijay Wadettiwar-Chhagan Bhujbal
BJP Leader join Shiv Sena : ठाकरेंचा भाजपला जोरदार धक्का; महिला आघाडीचा आक्रमक चेहरा शिवसेनेत दाखल

विरोधी पक्षनेत्यांनी हिंगोलीच्या मेळाव्याला जाणार असल्याचे स्पष्ट करताना सांगितले की, हिंगोली येथील मेळाव्याची जोरदार तयारी आमच्या ओबीसी बांधवांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही आमची भूमिका विशद केली होती. पण, गेल्या दोन दिवसांपासून मला हजारो ओबीसी बांधवांनी फोन केले. हिंगोलीतील ओबीसी मेळाव्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये उपस्थित राहावे, अशी विनंती केली. ओबीसी नेत्यांनीही मला तसं सांगितलं, त्यामुळे मी हिंगोलीच्या मेळाव्याला जाणार आहे.

हिंगोलीतील ओबीसी मेळावा हा सर्वपक्षीय आहे. ओबीसींसाठी आवश्यकता पडली तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली आहे. मीसुद्धा ओबीसींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. आम्हाला कुणाचंही नुकसान करायचं नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मराठा समाजातील गरिबांना आरक्षणाचा लाभ व्हावा, अशी इच्छा मराठा समाजाची असेल तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. पण ते ओबीसीतून नको ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांची भूमिका आहे, तीच माझी भूमिका आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

Vijay Wadettiwar-Chhagan Bhujbal
Jayakwadi Water Issue : विवेक कोल्हे संतापले, ‘हे दुर्दैवी...पाणी पिण्यासाठी नव्हे; तर...’

मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधूनच मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे. आता मराठा समाजाला मुख्यमंत्री कोणत्या प्रवर्गातून आरक्षण देतात, हे पाहावे लागेल. तो मुद्दा कसा सोडवायचा, हा मुख्यमंत्र्यांचा प्रश्न आहे, असेही वडेट्टीवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Vijay Wadettiwar-Chhagan Bhujbal
NCP Crisis : ‘दादा...दादा..करता अन्‌ पिटिशन दाखल करता’ तटकरेंच्या प्रश्नाला सुळेंचे उत्तर ‘मी मर्यादा ओलांडणार नाही...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com