Maratha Reservation : सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण हाणून पाडणाऱ्यांचा धनी कोण? आमदार कानडेंचा फडणवीसांवर निशाणा

MLA Lahu Kanade Question : या आत्महत्यांचा जाब आम्ही सरकारला विचारणार : आमदार लहू कानडे
 Lahu Kanade-Devendra Fadnavis
Lahu Kanade-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

प्रदीप पेंढारे

Nagar News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून श्रीरामपूरचे काॅंग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘उच्च न्यायालयात मान्य झालेले मराठा आरक्षण ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि मेरिट ॲंड मेरिट सेव्ह नेशन, अशा काही संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात वकिलांच्या फौज उभ्या करत हाणून पाडले. यामागील धनी कोण आहे, याची सर्वच शिक्षित आणि इंटरनेट फ्रेंडली युवकांना माहिती आहे', असा टोला आमदार कानडे यांनी लगावला आहे. (Who is the leader of those opposing Maratha reservation in Supreme Court? MLA Lahu Kanade)

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याअगोदर काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आणि मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिलेले होते. सत्तांतरानंतर २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांनी मुस्लिम समाजाचे आरक्षण स्थगित ठेवले. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यायचे म्हणून विधेयक आणले. सर्वच आमदारांची मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता, असे आमदार कानडे यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Lahu Kanade-Devendra Fadnavis
Lingayat Reservation News : आरक्षणासाठी आता लिंगायत समाजही रान पेटविणार...

ते म्हणाले की, मराठा आरक्षणाला न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले. उच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले. ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि मेरिट ॲंड मेरिट सेव्ह नेशन, अशा काही संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात वकिलांच्या फौज उभ्या करत आरक्षण हाणून पाडल्याचे दिसते. या सर्वांच्या मागील धनी कोण आहे, याची माहिती समाजातील सर्वच शिक्षित आणि इंटरनेट फ्रेंडली युवकांना आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा आंदोलन करावे लागणे हे शिंदे-फडणवीस सरकारचे अपयश असल्याचे सांगून मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला पाहिजे, असेही आमदार लहू कानडे म्हणाले. मराठा आरक्षणासाठी आता राज्यात आक्रमक आंदोलने सुरू झाली आहेत. आत्महत्या सुरू झाल्या आहेत. हे दुःखद आणि वेदनादायक आहे. या आत्महत्यांचा जाब आम्ही विचारणार असल्याचा इशाराही कानडे यांनी दिला.

 Lahu Kanade-Devendra Fadnavis
Karnataka Politics : ‘५० कोटी अन्‌ मंत्रिपद...भाजपची कर्नाटकातील काँग्रेस आमदारांना ऑफर’

राज्यपालांना भेटणार

शिंदे-फडणवीस या महायुती सरकारने सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. काॅंग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काॅंग्रेस पक्षाचे सर्वच आमदार मुंबई येथे एकत्र येणार आहोत. राज्यपालांची भेट घेऊन त्यावर तोडगा काढण्याची मागणी करणार असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.

 Lahu Kanade-Devendra Fadnavis
Pawar Vs Modi : नरेंद्र मोदींना घायाळ करणारा शरद पवारांचा ‘दुसरा’...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com