Maratha Reservation : मराठा आंदोलनाची झळ ग्रामपंचायत निवडणुकांना; या भीतीने प्रचाराला नेते येईनात

Maratha Andolan Effect On Gram Panchayat Election : राज्यात मराठा आंदोलनाची तीव्रता वाढत आहे आणि याचा फटका आता ग्रामपंचायत निवडणुकांनाही बसतोय.
Maratha Reservation
Maratha Reservation Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Politics News : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची झळ ग्रामपंचायत निवडणुकांना बसू लागली आहे. गावबंदीच्या भीतीने प्रचारासाठी गावात नेते यायला तयार नाहीत. आंदोलन असेच सुरू राहिल्यास निवडणुकीवर बहिष्कार घातला जातो की काय, अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation News : मराठा आरक्षणाबाबत दोन दिवसांत तोडगा निघणार...; आरोग्यमंत्री सावंतांचे मोठे विधान

नगर जिल्ह्यात १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा सुरू आहे. पाच नोव्हेंबरला मतदान होत आहे. अर्ज माघारी, चिन्ह वाटप आणि आता पॅनेल तयार होऊन प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. मात्र, मराठा आंदोलनामुळे निवडणुकीत प्रचाराचा जोर दिसत नाही. आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळाने गावात पॅनेल तयार झाले आहेत. आता प्रचाराची वेळ असतानाच मराठा आरक्षणासाठी आंदोलनाने पेट घेतला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकींची चर्चाच होताना दिसत नाही.

नेते, पदाधिकारी प्रचारासाठी येत नाहीत. उमेदवार, त्याच्या पॅनेलकडून आमंत्रण आले, तरी नेते, पदाधिकारी अगोदर मराठा आंदोलनाची चाचपणी करताना दिसत आहेत. मराठा आंदोलकांचा रोष नकोच म्हणून नेते, पदाधिकारी प्रचाराला जाणे टाळत आहेत. पॅनेल प्रचाराचा श्रीफळ वाढवण्यासाठीदेखील नेते येत नाहीत.

पॅनेल आणि त्यातील उमेदवारदेखील मराठा आंदोलकांचा रोष नको म्हणून काळजी घेत आहेत. राजकीय नेते, पदाधिकारी यांना टाळत आहेत. एकंदर मराठा आरक्षणाचा फटका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला बसू लागला आहे. जाहीर प्रचारापेक्षा समाज माध्यमांवरील प्रचाराला उमेदवार सध्या तरी पसंती देत आहेत. मराठा आरक्षणाचे आंदोलन शांत झाल्यास जाहीर प्रचाराचे नियोजन काही उमेदवारांनी केले आहे. असे असले, तरी हे आंदोलन किती दिवस चालू राहणार? यावर तोडगा निघणार की नाही? तोडगा न निघाल्यास मराठा समाज मतदाराबाबत काय भूमिका घेणार, यावर सध्या उमेदवारांमध्ये चर्चा आहे.

शिंदा गावात नेत्यांना गावबंदी

कर्जत तालुक्यातील शिंदा गावात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली जाहीर कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. गावातील मुख्य चौकातील विठ्ठल रुख्मिणी मंदिरासमोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सरपंच मधुकर घालमे, मंगेश ढेरे, गणेश घालमे, संभाजी घालमे, अंबादास हवालदार, अशोक भोस, शुभम मिसाळ यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

राहुरीत सोमवारपासून मराठा आक्रमक

राहुरीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाजाची बैठक झाली. राहुरी तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून (ता. ३०) मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू करणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले. साखळी उपोषणात प्रत्येक गाव सहभागी होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाने दिली.

Maratha Reservation
Satara News : मराठा आरक्षणाची मागणी गांभीर्याने घ्या; माथाडी संघटना महाराष्ट्राचे अन्नधान्य बंद करेल : शशिकांत शिंदे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com