Solapur Lok Sabha : प्रणिती शिंंदेंच्या प्रचारासाठी मराठा समाजाच्या समन्वयकाने वीस लाख घेतले; शिवसेना जिल्हाप्रमुखांचा आरोप

Maratha Samaj News : माऊली पवार यांच्यासोबत गाडीत असलेल्या एका माणसाला पैसे न मिळाल्यामुळे ही गोष्ट बाहेर आली आहे. समाजाच्या नावाने दुकानदारी मांडणाऱ्या व्यक्तीपासून सावध राहिलं पाहिजे. समाजानेही ठरवलं पाहिजे की, आपण कोणाच्या पाठीमागं गेलं पाहिजे.
Amol Shinde-Praniti Shinde-Mauli Pawar
Amol Shinde-Praniti Shinde-Mauli PawarSarkarnama

Solapur, 06 May : सकल मराठा समाजाचे स्वघोषित समन्वयक माऊली पवार यांनी मनोज जरांगे पाटील हे सोलापुरात येण्याच्या आदल्या दिवशी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांचे काम करण्यासाठी काँग्रेस नगरसेवकाच्या घरात मिटिंग करून मंगळवेढा रस्त्यावर एका मोटारीत वीस लाख रुपये घेतले आहेत, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, खळबळजनक आरोप शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी माऊली पवार यांच्यावर केला.

अमोल शिंदे यांच्या आरोपामुळे सोलापूरमध्ये (Solapur) एकच खळबळ उडाली असून माऊली पवार (Mauli Pawar) यांनी हे आरोप बेछूट आणि बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. अमोल शिंदे यांनी आरोप सिद्ध करावेत; अन्यथा राजकारण सोडावे, असे आव्हान दिले आहे. त्यामुळे लोकसभेच्या पाठिंब्यावरून सोलापूरमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amol Shinde-Praniti Shinde-Mauli Pawar
Bhalke Support Mohite Patil : माढ्यात नवा ट्विस्ट; अभिजित पाटील भाजपसोबत जाताच भालकेंचा मोहिते पाटलांना पाठिंबा

अमोल शिंदे (Amol Shinde) म्हणाले, माऊली पवार यांच्यासोबत गाडीत असलेल्या एका माणसाला पैसे न मिळाल्यामुळे ही गोष्ट बाहेर आली आहे. समाजाच्या नावाने दुकानदारी मांडणाऱ्या व्यक्तीपासून सावध राहिलं पाहिजे. समाजानेही ठरवलं पाहिजे की, आपण कोणाच्या पाठीमागं गेलं पाहिजे. मराठा समाजाने (Maratha Samaj ) कुणाला मतदान करावं, असे आम्ही म्हणत नाही. कारण आम्ही कुणालाही पाठिंबा नाही, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. असं असताना स्वतःच्या आर्थिक लाभासाठी कोणी समाजाला विकण्याचे काम करत असतील, तर मराठा समाज कदापि शांत बसणार नाही.

माऊली पवार यांनी माझ्यावर खुशाल मानहानीचा दावा दाखल करावा. माझ्याकडे असलेले पुरावे एवढे सबळ आहेत की, मी बोललो ते खरे आहे, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत. पण, आगामी काळात मराठा समाजासमोर तुम्ही काय म्हणून जाणार आहात, हे सर्वांत महत्वाचे आणि मोठी गोष्ट आहे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे राजकारण करण्यासाठी मराठा समाज सक्षम आहे. अशा मराठा समाजाला पैसे घेऊन काही तरी शिकविण्याचे काम कोणी करू नये. मराठा समाजाने आजपर्यंत बरेचसे नेते घडवले आहेत, बरेच नेते पाडले आहेत. त्यामुळे स्वघोषित मराठा समाजाच्या समन्वयकालाही मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.

Amol Shinde-Praniti Shinde-Mauli Pawar
Abhijeet Patil : फडणवीससाहेब, अभिजित पाटलांमुळे माढा-सोलापुरात वजाबाकी तर होणार नाही ना?

काँग्रेस नगरसेवकाच्या घरात माऊली पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मिटिंग झाली. त्यानंतर त्यांना पैसे देण्याचं ठरलं आणि मंगळवेढा रोडवर एनोव्हा क्रिस्टा गाडीत माऊली पवार यांनी ते पैसे स्वीकारले. मनोज जरांगे पाटील ज्या दिवशी सोलापूरमध्ये आले होते, त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी प्रणिती शिंदे यांचा बुके घ्यावा, यासाठी माऊली पवार किती धडपड करत होते. बुके देऊ शकले नाहीत; म्हणून रामभाऊ जाधव यांना बघून घेण्याची भाषा बोलली गेली. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत फोटो काढायचा आाणि समाजाला पाठिंबा आहे, अशा भूलथापा देण्याचे त्यांचे काम त्याचदिवशी समाजासमोर आलं आहे, असेही अमोल शिंदे यांनी म्हटले आहे.

Amol Shinde-Praniti Shinde-Mauli Pawar
Solapur Loksabha : सिद्धेश्वर कारखाना बंद पाडून मला संपविण्याचा भाजपचा डाव होता; धर्मराज काडादींनी ठेवले मर्मावर बोट...

आरोप सिद्ध करून दाखवावेत : माऊली पवार

याबाबत माऊली पवार म्हणाले, शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्याकडून माझ्यावर बेछूट आणि तथ्यहीन आरोप करण्यात आले आहेत. शिंदे यांनी पुराव्यानिशी ते सिद्ध करून दाखवावं, मी समाजकारण करणं बंद करतो आणि अमोल शिंदे हे ते सिद्ध करू शकले नाही तर त्यांनी राजकारण करणं बंद करावं, असं माझं जाहीर आव्हान आहे. मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे, तीच आमची भूमिका आहे.

Amol Shinde-Praniti Shinde-Mauli Pawar
Vitthal Sugar Factory : विठ्ठल कारखाना अन्‌ सत्ताधारी...; अभिजित पाटलांनी औदुंबरअण्णांपासून भालकेंपर्यंतचा इतिहासच सांगितला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com