हैद्राबाद गॅझेटवरून राजकारण तापलं? भुजबळ vs जरांगे वाद चिघळला असतानाच भाजपच्या बड्या नेत्याचे सूचक वक्तव्य; म्हणाला, 'त्यांनी प्रयत्न करावेत'

Chandrakant Patil On Chhagan Bhujbal And Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्याच्या राजकीय तसेच सामाजिक पटलावर चर्चेचा आणि वादाचा विषय बनला आहे. मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू झाल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सातत्याने सरकारवर टीका करताना दिसत आहेत.
Chhagan Bhujbal And Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal And Manoj Jarange Patilsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. हैद्राबाद गॅझेट लागू केल्यानंतर राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष उफाळला आहे.

  2. ओबीसी नेते छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

  3. भुजबळांच्या समितीत गॅझेटविरोधात आक्रमक भूमिका घेतली गेली आहे.

  4. सांगलीत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी जरांगे यांना अंमलबजावणीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.

  5. तसेच भुजबळांची समजूत काढू, असे वक्तव्य केल्याने राज्यात चर्चा रंगली आहे.

Sangli News : मराठा समाजाला हैद्राबात गॅझेट लागू होणारा शासन निर्णय काढल्यापासून मराठा विरूद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाला आहे. ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके जरांगे पाटील यांच्यावर तुटून पडताना दिसत आहेत. तर भुजबळ यांनी ओबीसी समाजासाठी नियुक्त केलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीत हैद्राबाद गॅझेटवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे राज्यात सध्या जरांगेंविरूध भुजबळ आणि हाके असा वाद पाहायला मिळत आहे. यादरम्यान भाजपचे नेते तथा उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे. तर जेष्ठ नेते भुजबळ यांची समजूत काढू असा भाष्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. ते सांगलीत बोलत होते.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषणकरून सरकारला गुडघे टेकायला लावले आहेत. महायुती सरकारने जरांगे यांचे आंदोलन थांबवण्यासाठी 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या. त्याचा शासन निर्णयही काढला. ज्यात सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू केलं आहे. याच शासन आदेशावरून आता मराठा-ओबीसी अशी ठिणगी पडली आहे. जरांगें विरूद्ध ओबीसी नेते भुजबळ आणि हाके असा सामना पाहायला मिळत आहे.

Chhagan Bhujbal And Manoj Jarange Patil
Chandrakant Patil : सकाळी जरांगेंच्या आंदोलनावर प्रश्न करणारे चंद्रकांतदादा रात्री म्हणतात, ‘मनोज जरांगे पाटील माझे चांगले मित्र...’

भुजबळ यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त थेट महायुतीला अंगावर घेत उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तर हाके आता मेळावे आणि सभेतून जरांगे यांच्यासह सरकारवर हक्का करताना दिसत आहेत. आतातर मुंबईत भव्य मेळाव्याचं आयोजन केलं जात आहे.

या दरम्यान चंद्रकांतदादा यांनी मनोज जरांगे पाटील यांना, त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी अल्टिमेट न देता या मागण्यांची अंमलबजावणी कशी होईल, यासाठी प्रयत्न करावेत. सरकारने मागण्या मान्य केल्याने आता आंदोलनाची धार देखील कमी होईल, असा दावाही चंद्रकांतदादा यांनी केला आहे.

दरम्यान, मंत्री छनग भुजबळ यांच्या नाराजीवर भाष्य करताना चंद्रकांतदादा यांनी, सरकारने कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावत नाही आणि लावणारही नाही. मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. भुजबळ यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांची आम्ही समजूत काढू असेही चंद्रकांतदादा यांनी सांगितले आहे.

Chhagan Bhujbal And Manoj Jarange Patil
Chandrakant Patil यांचा Manoj jarange Patil यांच्यावर सणसणीत टोला ।Maratha Reservation Protest।

FAQs :

प्र.1: संघर्ष कशामुळे सुरू झाला?
उ.1: हैद्राबाद गॅझेट लागू केल्याने मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण मिळेल, यामुळे संघर्ष उभा राहिला.

प्र.2: कोणते नेते जरांगेवर टीका करत आहेत?
उ.2: ओबीसी नेते छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्यावर टीका केली आहे.

प्र.3: मंत्रिमंडळाच्या उपसमितीत काय घडले?
उ.3: भुजबळांनी गॅझेटविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

प्र.4: चंद्रकांत पाटील यांनी काय विधान केले?
उ.4: जरांगे यांनी अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे आणि भुजबळांची समजूत काढू, असे त्यांनी सांगितले.

प्र.5: हे वक्तव्य कुठे करण्यात आले?
उ.5: चंद्रकांत पाटील सांगली येथे बोलत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com