Markadwadi Voting : देशविरोधी कारवाईच्या गुन्ह्याचा इशारा...अन्‌ मारकडवाडी ग्रामस्थांनी घेतली माघार!

Ballot Paper Voting : भारतीय न्याय संहितेतील कलम 152 नुसार संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच, राष्ट्र, राज्यविरोधी कारवाई केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. कायद्यातील कलमानुसार संबंधितांना आजन्म कारावासाची शिक्षाही होऊ शकते, असा इशाराही दिल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Markadwadi Voting
Markadwadi VotingSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 03 December : ईव्हीएम मशीनवरून संशय व्यक्त बॅलेट पेपरवर मतदानासाठी आक्रमक झालेल्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे अखेर माघार घेतली. प्रशासनाचा आदेश डावलून ग्रामस्थांनी मतदान प्रक्रिया राबवली असती तर भारतीय न्याय संहितेतील कलम १५२ नुसार संबंधितावर देश आणि राज्यविरोधी कारवाई केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता, त्यामुळे संबंधितांवर आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती सोलापूर जिल्हा पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी (Markadwadi ) ग्रामस्थांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांना पडलेल्या मतांवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या प्रक्रियेचा संपूर्ण खर्च करण्याची तयारीही ग्रामस्थांनी दाखवली होती. मात्र, प्रशासनाने मारकडवाडी ग्रामस्थांना परवानगी नाकारली होती.

मारकडवाडीत जमावबंदीचा आदेश लागू केला होता. तसेच, आमदार उत्तम जानकर यांचे समर्थक असलेल्या २० ते २५ कार्यकर्त्यांना नोटिसही दिली होती. मात्र, ग्रामस्थ बॅलेट पेपरवर मतदान (Ballot Paper Voting) घेण्यावर ठाम होते. अखेर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मारकडवाडीत दाखल होत ग्रामस्थांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणू दिले. आमदार उत्तम जानकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय मागे घेतला.

Markadwadi Voting
Markadwadi Voting : मारकडवाडी प्रकरणाला नवे वळण; फक्त पेटीवर घालवायचंय, सातपुतेंनी व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे वाद वाढणार

वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणाले, मारकडवाडी गावात जमावबंदीचे आदेश लागू करुनही गावकऱ्यांनी तो नियम मोडला. या प्रकरणी १७ जणांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याशिवाय अफवा पसरविल्याप्रकरणीही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

Markadwadi Voting
Markadwadi Voting : उत्तम जानकर हे प्यादं, मारकवाडी प्रकरणाचा मास्टर माईंड रणजितसिंह मोहिते पाटीलच;राम सातपुतेंचा हल्लाबोल

मतदान प्रक्रिया पार पडलेली असताना देखील अशा पद्धतीने मतदान घेणे कायद्याला धरुन नाही, त्यामुळे पोलिसांकडून गावकऱ्यांना नोटीस देण्यात आली होती. भारतीय न्याय संहितेतील कलम 152 नुसार संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच, राष्ट्र, राज्यविरोधी कारवाई केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. कायद्यातील कलमानुसार संबंधितांना आजन्म कारावासाची शिक्षाही होऊ शकते, असा इशाराही दिल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com