Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सोलापुरात सलग तिसऱ्या दिवशी धक्का; युवा सेनेच्या 21 पदाधिकाऱ्यांचे सामूहीक राजीनामे

Solapur Yuva Sena News : शिवसेनेचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख महेश साठे यांच्यावर आरोप करत या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत, त्यामुळे सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
Solapur Yuva Sena News
Solapur Yuva Sena NewsSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 03 August : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सोलापूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी धक्का बसला आहे. युवा सेनेच्या तब्बल 21 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत, त्यामुळे सोलापूच्या शिवसेनेत खळबळ उडाली आहे. मात्र, या गटबाजीमुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. या सर्व 21 पदाधिकाऱ्यांनी माजी संपर्कप्रमुख शिवाजी सावंतांच्या सन्मानार्थ राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.

सोलापूर (Solapur) युवा सेनेचे शहरप्रमुख समर्थ मोटे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील निंबाळकर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख अनिकेत सूळ, सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख देविदास लिंबोळी, सोशल मीडिया सोलापूर शहरप्रमुख अनुपसिंह बायस, युवा सेना उपशहरप्रमुख मयूर झांबरे, युवा सेना उपशहरप्रमुख मल्लिकार्जून पगडीकर, उपशहरप्रमुख अनिल माळी, उपशहर प्रमुख सागर सलगर, विभागप्रमुख प्रशांत लोणार, विश्वास सुरवसे, सुरेश फरड, विनायक म्हेत्रे, पंकज कांबळे, ज्ञानेश्वर भंडारे, राज बिडला, युवा सेना प्रवक्ता प्रमोद सलगर, अनिल कोळी, सन्मील येलडी, नामदेव पाटील, आशिष परदेशी या पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या पदाचे राजीनामा दिला आहे.

शिवसेनेचे सोलापूर संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी गुरुवारी (ता. ३१ जुलै) तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तो राजीनामा देताना ‘आपण जिल्हासंपर्क असूनही शिवसेनेच्या कामकाजात मला विश्वासात घेतले जात नाही. अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका मला न सांगता झालेल्या आहेत. माझ्या माढा तालुक्यातील शिवसेनेचे तालुकाप्रमुख आणि शहरप्रमुख यांच्या नेमणुकाही माझ्या अपरोक्ष झाल्या आहेत. शिवसेना पक्षश्रेष्ठींचा माझ्यावर विश्वास नसल्यामुळे मी माझ्या जिल्हासंपर्क प्रमुखपदाचा राजीनामा देत आहे, असे शिवाजी सावंत यांनी म्हटले होते.

शिवाजी सावंतांच्या राजीनाम्यानंतर शनिवारी (ता. 02 ऑगस्ट) सोलापूर शहरातील तब्बल अकरा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. शिवसेनेचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख महेश साठे यांच्यावर आरोप करत या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत, त्यामुळे सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Solapur Yuva Sena News
Vijayadevi Desai : शंभूराजला कलेक्टर करायचं होतं; पण तो होऊ शकला नाही : विजयादेवी देसाईंनी सांगितल्या आठवणी!

शिवसेना सोलापूर शहर समन्वयक दिलीप कोल्हे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख आशिष परदेशी, सोशल मीडिया शहर प्रमुख सागर शिंदे, वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख जवाहर जाजू , युवासेना उपशहर प्रमुख मयूर झांबरे, नवनाथ भजनावळे, राहुल काटे यांच्यासह अकरा पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे.

Solapur Yuva Sena News
Shambhuraj Desai : मेघदूत बंगल्याच्या गृहप्रवेशावेळी शंभूराज देसाईंना अश्रू अनावर, हमसून हमसून रडले; काय आहेत आठवणी!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे, त्यामुळे निवडणुकीत या गटबाजीचा पक्षाला तोटाच होण्याची शक्यता आहे. एकीकडे पक्षात इनकमिंग होत असताना सर्वांना सोबत घेऊन जाऊ शकणारे नेतृत्व पक्षात नसल्यामुळे शिवसेनेते काहींसा विस्कळीतपणा आल्याचे दिसून येते.

युवा सेनेच्या वीस पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. शिवाजी सावंत यांच्यावर जो अन्याय सुरू आहे. संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांना डावलून ज्या पदाधिकाऱ्यांच्या नियुकत्या केल्या जातात. संपर्कप्रमुख सावंत यांना डावलून जी पदे दिली जातात, शहरप्रमुखसारखी पदं शिवाजी सावंतांना डावलून दिली जातात. यापुढे संपर्कप्रमुख विचारूनच नियुक्त्या करण्यात याव्यात, अशी मागणी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com