Gopichand Padlkar Vs Jayant Patil : हॉटेल सोनीचा डाटा काढायला लावू नका... : शरद पवारांच्या शिलेदाराने पडळकरांना चिकटवलं नवं प्रकरण

Mehboob Shaikh stern warning to BJP MLA Gopichand Padalkar : जयंत पाटील यांच्या कुटुंबाबाबत वापरलेल्या अपशब्दांमुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीकेची झोड होताना दिसत आहे. सोमवारी (ता. 22) पडळकर यांच्या निषेधार्थ भव्य मोर्चा सांगलीत काढण्यात आला होता.
BJP MLA Gopichand Padalkar And  Jayant Patil
BJP MLA Gopichand Padalkar And Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील व स्व. राजारामबापू पाटील यांच्यावरील वक्तव्यामुळे सांगलीत भव्य मोर्चा निघाला.

  2. युवा नेते मेहबूब शेख यांनी मोर्चात पडळकरांवर जोरदार टीका केली.

  3. त्यांनी कडक इशारा देत “हॉटेल सोनी डेटा काढायला लावू नका” असे वक्तव्य केले.

Sangli News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यासह दिवंगत राजारामबापू पाटील यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर चहुबाजुंनी घेरले आहेत. सोमवारी (ता.22) सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चात युवा नेते मेहबूब शेखही उपस्थित होते. यावेळी त्यांनी पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत जोरदार टीका केली. तसेच 'हॉटेल सोनीमधील डेटा काढायला लावू नका...',अशा पडळकरांना कडक शब्दात इशाराही दिला. त्यांच्या या इशाऱ्यानंतर आता पडळकर आणि हॉटेल सोनी हे नवे प्रकरण काय असा सवाल सांगलीसह राज्यभर विचारला जाऊ लागला आहे.

जयंत पाटील यांच्या कुटुंबाबाबत पडळकरांनी वापरलेल्या अपशब्दांच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार निलेश लंके, अपक्ष खासदार विशाल पाटील, आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, विश्वजीत कदम, रोहित पाटील यांच्यासह युवा नेते मेहबूब शेखही उपस्थित होते.

यावेळी मेहबूब शेख यांनी पडळकरांवर सडकून टीका केली. त्यांनी पडळकरांवर गंभीर आरोप करताना, पडळकरांची तुलना कुत्र्यासोबत केली. यावेळी ते म्हणाले की, बीडमध्ये कुत्र्याचे तीन प्रकार पाडले जातात. एक साधा कुत्रा, दुसरा पिसाळलेला आणि तिसरा खर्जुला कुत्रा. पडळकर हा तिसऱ्या प्रकारातील खर्जुला कुत्रा आहे अशी टीका त्यांनी केली.

BJP MLA Gopichand Padalkar And  Jayant Patil
Jayant Patil Vs Gopichand Padalkar : जयंत पाटील 15 वर्षांपूर्वीच गोपीचंद पडळकरांच्या डोक्यात गेले होते.. दोघांच्या वादाची A टू Z स्टोरी

पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर मी तुझ्यासारखा भिकाऱ्याची अवलाद हा गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. जयंत पाटील हा बिनडोक माणूस असून त्याला काही अक्कल नाही. तसेच जयंत पाटील हा स्वर्गीय राजारामबापू पाटील यांची औलाद आहेत, असे वाटतं नाही अशी पातळी सोडून टीका केली होती.

आरोप झाकण्याचा प्रयत्न

यावरून शेख यांनी पडळकरांवर जोरदार निशाणा साधला. पडळकर हा जयंत पाटील यांच्या आईबद्दल बोलत आहे. टीका करणे ते ही खालच्या तातळीवर जाऊन हा फक्त एक बहाणा असून हे प्रयत्न आरोप लपवण्यासाठी केले जात आहेत. खरं तर अवधूत वडारच्या आत्महत्येच्या घटनेला लपवण्यासाठी पडळकर असे आरोप करत आहेत.

अवधूत वडारची आत्महत्या का झाली? पडळकर यांच्या पीएने अवधूत वडारला मारहाण का केली? बोगस बिलं का मागितली? त्यांच्या सांगण्यावरून एका जिल्हा परिषद सदस्याने दमदाटी केली का? या दबावामुळेच वडारने आत्महत्या केली, असा आरोप त्यांच्यावर वडार यांच्या बहिणीने केला होता, असाही दावा शेख यांनी केला.

यावेळी शेख यांनी पडळकर यांना मोठा इशारा देताना सांगली, कोल्हापूर आणि कराडमधील हॉटेलचा डेटा आपल्याला काढायला लाऊ नका असे म्हटलं आहे. असा मोठा इशारा मेहबूब शेख यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला. तसेच खास करून 'हॉटेल सोनीमधील डेटा काढायला लावू नका...', असाच दम त्यांनी भरला आहे.

BJP MLA Gopichand Padalkar And  Jayant Patil
Jayant Patil Vs Gopichand Padalkar : जयंत पाटलांना नडले, पवारांना भिडले... मातब्बर नेत्यांविरोधात गोपीचंद पडळकरांचं राजकारण कसं उभं राहिलं?

FAQs :

1. मोर्चा का काढण्यात आला?
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ.

2. मोर्चात प्रमुख वक्ते कोण होते?
युवा नेते मेहबूब शेख.

3. मेहबूब शेख यांनी काय इशारा दिला?
त्यांनी पडळकरांना “हॉटेल सोनी डेटा काढायला लावू नका” असा थेट इशारा दिला.

4. मोर्चा कुठे पार पडला?
सांगलीत.

5. या घटनेचा राजकीय परिणाम काय झाला?
पडळकरांविरोधात संताप उसळला असून सांगलीत राजकीय वातावरण तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com