Jayant Patil News : राज्यातील जनतेची आता महायुतीचे सरकार बदलण्याची मानसिकता; जयंत पाटील यांचं मोठं विधान

Jayant Patil Statement : राज्यातील आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असताना ती पूर्ववत करण्याची जबाबदारी येत्या काळात महाविकास आघाडीलाच घ्यावी लागणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Sangali News : राज्यातील जनतेची आता महायुतीचे सरकार बदलण्याची मानसिकता झाली आहे. विकास दर कोसळला आहे तर राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा बोजवारा उडाला आहे. शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहाव्या स्थानावर घसरले आहे.

अर्थव्यस्थेत राज्यावर मोठा कर्जाचा डोंगर आहे. हे सरकार सत्तेतून जाईल, त्यावेळी राज्यावर साडे नऊ लाख कोटी रुपयांचे कर्ज असणार आहे. राज्यातील आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असताना ती पूर्ववत करण्याची जबाबदारी येत्या काळात महाविकास आघाडीलाच घ्यावी लागणार, असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शिवस्वराज्य यात्रेची सांगता बुधवारी इस्लामपूर शहरात शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या सभेला शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बरोबर सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, रोहित पाटील यांच्यासह पक्षाचे खासदार, आमदार उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

राज्यात पक्षात फुट पाडल्यानंतर आमच्यावर मोठी टीका झाली. मात्र, आता राज्यातील वातावरण पूर्णपणे बदलले आहे. लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला आहे. राज्यभरात शिवस्वराज्य यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एका तालुक्यात तर पक्षाकडे 30 जणांनी उमेदवारी मागितली आहे. प्रत्येक मतदारसंघात चार ते पाच इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न आहे. त्यामुळे आता यात्रा झाल्यानंतर उमेदवारी देण्यासंदर्भात बैठक होईल.

शिवस्वराज्य यात्रेत खूप काही वेगळे अनुभव आले. यावेळी राज्यातील सर्वच भागातील परिस्थिती जाणून घेता आली. गडचिरोलीतील आदिवासी कुटुंबाची घेतलेली भेट असो अथवा शिवनेरीवर क्रेनमधून आम्ही पडता पडता वाचलो, तो क्षण असेल खूप काही अनुभव या निमित्ताने आले, असल्याचे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले.

Jayant Patil
Shayam Manav News : श्याम मानवांच्या भाषणावेळी गोंधळ, भाजयुमोनं कार्यक्रम उधळून लावला

पुढील 35 दिवस काळ आणि वेळ संघर्षाची

पुढील 35 दिवस काळ आणि वेळ संघर्षाची असल्याचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले. आता मतदारसंघात पुन्हा सभा घेण्याची गरज नाही, इतकं तुम्ही प्रेम दिल्याचे कोल्हे म्हणाले. शरद पवार यांच्या विचारामुळे शिवस्वराज्य सभेला राज्यभरात भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्रातील निवडणूक ही आता महाराष्ट्र धर्म वाचवण्याची आणि टिकवण्याची निवडणूक असल्याचे कोल्हे म्हणाले.

Jayant Patil
Congress Politics : महाराष्ट्रासाठी काँग्रेसने सत्ता सोडली, काय आहे जम्मू-काश्मिरमधील समीकरण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com