Kolhapur Political News : गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात लोकसभेची तयारी करत असलेल्या गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवाराला वाट मोकळी करून दिली.
निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर डॉ. चेतन नरके कोणाला पाठिंबा देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं होते. आज (सोमवार) डॉ. चेतन नरके यांनी आपली भूमिका जाहीर करत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj) यांच्या समर्थनात उभे राहणार असल्याची घोषणा केली. सोशल मीडियात त्या संदर्भात पोस्ट टाकत त्यांनी ही माहिती दिली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीला लागलेले चेतन नरके Chetan Narake यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, ही जागा काँग्रेसला गेल्याने त्या ठिकाणी शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली.
त्यानंतर नाराज झालेल्या नरके यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावरही मवाळ भूमिका घेत कोल्हापूर लोकसभा Kolhapur Loksabha निवडणुकीतून माघार घेतली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लवकर त्या संदर्भात आपली भूमिका जाहीर करण्याचं ही डॉ. नरके यांनी पत्रकार परिषदेतून सांगितल्यानंतर नरके कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. अखेर नरके यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना पाठिंबा दिला आहे. त्या संदर्भात नरके गटाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात नरके ही आपली भूमिका स्पष्ट करणार असून शाहू महाराज छत्रपती यांच्या समर्थनात ते प्रचारात उतरणार आहेत.
दरम्यान, भविष्यातील राजकीय गणितांचा फायदा घेत गोकुळ आणि कोल्हापूर जिल्हा बँकेत संचालक पदावर राजकीय वाट मोकळी करण्यासाठी चर्चा झाल्याची ही समजते. या मुद्द्यावर शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवाय राजकीय क्षेत्रात महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील यांच्याकडून पुढील प्रत्येक प्रवासात सोबत राहण्याचे आश्वासन घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.