Milk Rate Protest : दुग्धविकास मंत्र्यांच्या जिल्ह्यातच दूध दरवाढीसाठी उपोषण; चौथ्या दिवशीही दखल नाही...

Radhakrushna Vikhe Patil : आम्ही प्राण पणाला लावून लढा तीव्र करणार, शेतकऱ्यांचा इशारा...
Milk Rate Protest :
Milk Rate Protest :Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : दुग्धविकास मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दुधाला 34 रुपये भाव दूध कंपन्या आणि दूध संघांनी द्यावा, असा आदेश काढलेला असतानाही या आदेशाचे पालन केले जात नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांना 26-27 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे सरकारने दूध कंपन्या आणि संघांना 34 रुपये दर देण्यासाठी प्रवृत्त करावे, त्यासाठी कठोर पावले उचलावीत, या मागणीसाठी अकोले इथे दूध उत्पादन शेतकऱ्यांनी उपोषण आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. (Latest Marathi News)

Milk Rate Protest :
Milk Producers Protest : दूध उत्पादकांचा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेंना इशारा, म्हणाले...

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलन सुरू असून, आज उपोषणाचा 6 वा दिवस आहे, तर किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. या सर्व उपोषणकर्त्यांची आता शारीरिक परिस्थिती बिघडत चालली असून, काहींची शरीरातील साखर पातळी कमी झाल्याने, त्यांना तीव्र अशक्तपणा जाणवत आहे. मात्र, तरीही सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलकांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नवले यांनी केला आहे.

सरकारच्या दुर्लक्षामुळे आता दूध उत्पादक शेतकरी आपला लढा अजून तीव्र करणार आहेत. आज राज्यभर तहसील कचेरीवर शेतकरी धरणे आंदोलन करणार असून, अकोले इथे तहसीलदार कार्यालयात जनावरे सोडून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे. सरकार आमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असले तरी आता आम्ही प्राण पणाला लावून लढा तीव्र करणार असल्याचा इशारा, अजित नवले यांनी दिला आहे.

Milk Rate Protest :
Mamta Bannerjee Vs Bjp : ममता बॅनर्जींची उघड धमकी; माझे चार तर तुमचे आठ जातील; भाजपची पोलिसात तक्रार...

या पूर्वी जून महिन्यात तसेच चालू महिन्यात दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे, विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या उपस्थितीत दूध कंपन्यांना, शासकीय दूध संघ आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत एकत्रित बैठक घेण्यात आली. या बैठकीत दुधाला 34 रुपये भाव देण्याचे आदेश कंपन्या आणि दूध संघांना देण्यात आला होता. मात्र, दुधाची वाढलेली आवक, आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध भुकटीचे घसरलेले दर अशी कारणे देत दुधाला 27 रुपये भाव कंपन्या आणि दूध संघ देत आहेत.

Milk Rate Protest :
Sachin Pilot : काँग्रेसचं सरकार सत्तेत येण्यापूर्वीच राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावरून पायलटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

या सर्व गोष्टींकडे शासन हतबलपणे पाहत असल्याचा आरोप करत शासन कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न शेतकरी संघटना करत आहेत, तर कंपन्या आणि दूध संघांवर दबाव वाढविल्यास त्यांच्याकडून दूध खरेदी करण्यावर, दूध संकलनावर परिणाम होईल, अशी भीती सरकारला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com