MIM Attack Rane : मशिदीत घुसून मारायला कुणाच्या बापाचं राज्य आहे का?; एमआयएमचा राणेंवर पलटवार

Farooq Shabdi challenge Nilesh Rane : राणे परिवारावर सर्व राज्य थुंकत असताना, हे नीलेश राणे दुसऱ्यांवर थुंकण्याची भाषा करत आहेत. महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही फारूक शाब्दी यांनी म्हटले आहे.
Nitesh Rane-Farooq Shabdi
Nitesh Rane-Farooq Shabdi Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 06 September : भाजप आमदार नीतेश राणे यांनी तीन दिवसांअगोदर मशिदीमध्ये घुसून मारू, असे चिथावणीखोर विधान केले होते. नीतेश राणेंच्या वक्तव्याला एमआयएमचे सोलापूर शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी प्रतिउत्तर दिले आहे. मशिदीमध्ये घुसून मारू म्हणता म्हणजे कुणाच्या बापाचं राज्य आहे का? असा सवाल शाब्दी यांनी केला आहे.

भाजप आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाला प्रत्युत्तर देताना फारुक शाब्दी म्हणाले, राणे कुटुंब संपूर्ण महायुतीला घेऊन बुडणार आहे. मशिदीमध्ये घुसून मारू, असं वक्तव्य करणारा हिंदू नसून राक्षस आहे. कोणत्याही प्रार्थना स्थळाबाबत असे वक्तव्य करणारा किंवा असे कृत्य करणारा हा राक्षसच असतो.

राणे पिता-पुत्रांवरही फारुक शाब्दी (Farooq Shabdi ) यांनी सडकून टीका केली. नुसतं थुंकलं तरी एमआयएम उडून जाईल, असं विधान माजी खासदार नीलेश राणे यांनी केले होते. त्या वक्तव्याचाही तीव्र शब्दांत विरोध करत, एमआयएमने नुसतं फुकलं तरी राणे कुटुंबीय उडून जाईल, असे प्रत्युत्तर शाब्दी यांनी नीलेश राणे यांना दिले.

Nitesh Rane-Farooq Shabdi
Cabinet Meeting : खटका उडालाच; लाडक्या बहिणीवरून मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे अन अजितदादांच्या मंत्र्यांत खडाजंगी!

राणे परिवारावर सर्व राज्य थुंकत असताना, हे नीलेश राणे दुसऱ्यांवर थुंकण्याची भाषा करत आहेत. वेगवेगळ्या घटनांनी महाराष्ट्रात महायुतीची दमछाक होत आहे, म्हणून महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही फारूक शाब्दी यांनी म्हटले आहे.

Nitesh Rane-Farooq Shabdi
Maharashtra Cabinet Decisions : अंगणवाड्या उजळणार सौरदिव्यांनी; राज्य सरकारचा मोठा निर्णय

नीलेश राणे यांना फारूक शाब्दी यांनी ओपन चॅलेंज दिले आहे. नीलेश राणे आगामी विधानसभा निवडणुकीत कुठे उमेदवारी भरणार आहे, ते सांगावे. त्यांच्या विरुद्ध मी उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवतो, असे आव्हान एमआयएम नेते फारूक शाब्दी यांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com