Solapur MIM News : तेलंगणातील यशाचे ‘टॉनिक’ एमआयएमला सोलापुरात आमदारकी मिळवून देणार...?

Telangana Assembly Elections : सोलापुरातील निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी खासदार ओवेसी लवकरच्या सोलापूरच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Farooq Shabdi-Asaduddin Owaisi
Farooq Shabdi-Asaduddin OwaisiSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे सोलापुरातील ‘बीआरएस’च्या नेत्यांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. दुसरीकडे, खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्या एमआयएमचा मात्र विश्वास वाढलेले दिसत आहे. एमआयएमचा मतदार हा काहीही झाले तरी पतंगाची साथ सोडत नसल्याचे दिसून आले आहे. उमेदवारांपेक्षा एमआयएमच्या मतदारांची निष्ठा पतंगावर असल्याचा संदेश सोलापूरच्या ‘एमआयएम’पर्यंत या निकालातून पोहोचला आहे. त्यामुळे एमआयएमला सोलापुरातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमदारकीचा संधी दिसू लागली आहे. ('MIM' hopes for MLA seat in Solapur due to success in Telangana assembly elections)

तेलंगणा विधानसभेत पूर्वी एमआयएमचे सात आमदार होते. ‘बीआरएस’ची सत्ता जाऊन तेलंगणात काँग्रेसची सत्ता आली. मात्र, एमआयएमच्या आमदारांच्या संख्येत कोणताही बदल झालेला नाही. पतंगापासून या पक्षाचा मतदार दुरावत नसल्याचे यापूर्वी सोलापुरातील जनतेने पाहिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Farooq Shabdi-Asaduddin Owaisi
Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी मोठा गौप्यस्फोट; ‘एकही आमदार अपात्र होणार नाही...’

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत ‘सोलापूर शहर मध्य’ या मतदारसंघात एमआयएमचे तौफिक शेख यांना 37 हजार 138 मते मिळाली होती. आयत्यावेळी नवखे उमेदवार असलेल्या फारुक शाब्दी यांनी मतदार संघात 2019 मध्ये पतंगाच्या चिन्हावर 38 हजार 721मते घेतली होती.

एमआयएमने सोलापूर महापालिकेच्या 2017च्या निवडणुकीत सुमारे तीस जागाांवर निवडणूक लढवली हेाती. त्या पैकी एमआयएम 9 जागांवर विजयी झाले होते. पक्षाचे नऊ उमेदवार दुसऱ्या, तीन उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. पक्षाच्या नऊ नगरसेवकांपैकी सहा जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Farooq Shabdi-Asaduddin Owaisi
Bidri Sugar Factory Result : दोन मंत्री, दोन खासदार, सात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या ‘बिद्री’ची मतमोजणी सुरू

सोलापूर महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये झालीच नाही, त्यामुळे एमआयएम पक्षामुळे नगरसेवक होतात की नगरसेवकांमुळे एमआयएम पक्ष टिकला होता? याचे उत्तर मिळू शकलेले नाही. त्यामुळे आगामी 2024च्या निवडणुकीत शहर मध्य मतदारसंघातच सोलापुरातील एमआयएमच्या ताकदीचा अंदाज येणार आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत सोलापुरातील निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी खासदार ओवेसी लवकरच्या सोलापूरच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एकट्या मुस्लिम मतांवर आमदार होणे अवघड

मुस्लिम आणि तेलुगु भाषिक समाज सोलापूरच्या राजकारणात निर्णायक आहेत. तेलंगणातील खासदार असदुद्दिन ओवेसी यांचा एमआयएम आणि के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती याच व्होट बँकेवर डोळा ठेवून सोलापुरात आले. पण, आमदार फक्त एकट्या मुस्लिम मतांवर होता येत नाही? याची जाणीव एमआयएमच्या नेत्यांना आहे.

Farooq Shabdi-Asaduddin Owaisi
Kamal Nath Meet High Command : दारुण पराभवानंतर कमलनाथ हायकमांडच्या दरबारी; राजीनाम्यासाठी दबाव?

शाब्दींचा जनसंपर्क

मोची, तेलुगु भाषिकांची मदत सोलापूर शहर मध्य मतदारसंघात आमदार होण्यासाठी घ्यावी लागणार आहे. विधानसभेची 2019 ची निवडणूक पराभूत झाल्यानंतर शाब्दी यांनी शहराध्यक्षाची जबाबदारी स्वीकारली. सर्वपक्षीय नेत्यांसोबतची मैत्री, सर्वधर्मिय कार्यक्रमांना हजेरी आणि जनसंपर्काच्या माध्यमातून एमआयएमचा विस्तार त्यांनी केला आहे. सोलापुरात आगामी काळात एमआयएमला नवा मित्र कोण मिळतो? यावर त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.

Farooq Shabdi-Asaduddin Owaisi
Katipally VenkataRamana Reddy : चाळीस वर्षांनी केसीआरचा पराभव करणारे; जायंट किलर कटीपल्ली व्यंकटरमण रेड्डी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com