Karad News : महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं. सोमवारी (ता.10) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर उलटसुलट प्रतिक्रिया सत्ताधारी आणि विरोधकांकडून उमटल्या जात आहेत. यानंतर विरोधी आणि सत्ताधारी पक्षांतील सदस्यांच्या प्रश्नांना सभागृहात उत्तर देणार असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी अर्थसंकल्पातील निधी वाटपावरुन केलेल्या नाराजीवर स्पष्ट केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे बुधवारी (ता.12) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी मंत्री भरत गोगावलेंच्या नाराजीवर भाष्य केलं. अजित पवार म्हणाले, ज्यावेळी अर्थसंकल्प सादर करतो, त्याला कॅबिनेट मान्यता देते. त्याच्यावर शेवटची सही मुख्यमंत्री यांची असते. हा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी मांडलेला आहे.
राज्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवुन समतोल विकास कसा साधता येईल, गरीब घटकाला त्यातून कसा न्याय देता येईल, हे बघून बजेट सादर केले आहे. अर्थसंकल्पावर विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील सदस्य प्रश्न त्याला मी सभागृहात उत्तर देणार आहे अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री भरत गोगावले यांनी अर्थसंकल्पातील निधी वाटपावरुन केलेल्या नाराजीवर व्यक्त केली.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या येथील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार आज येथे आले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, महिला बालविकास खात्याकडे लाडकी बहिण योजना आहे, ते खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. म्हणून राष्ट्रवादीची योजना नाही, ती महायुतीची योजना आहे. तो निधी सर्व महिलांना जातो.
राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्याचा विचार डोळ्यासमोर ठेवून आर्थिक घडी विस्कटणार नाही, आर्थिक शिस्त लागेल याचा विचार करुन आम्ही पुढे चाललो आहे. त्याबद्दल विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील सदस्य प्रश्न आहेत त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न माझा आहे.
पत्रीसरकार म्हणून ज्यांची ओळख होते. ते क्रांतीसिंह नाना पाटील यांना सव्वाशे वर्ष पूर्ण झाली आहेत. नाना पाटील यांच्या स्मारकाच्या बाबतीत व्हायला पाहिजे होते त्यापध्दतीने झालेले नाही. क्रांतीसिंह पाटील यांच्याबद्दल अभिमान असलेला मोठा समाज आपल्यात आहे. त्या सर्वांना समाधान वाटेल असा निर्णय महायुतीच्या सरकारकडून केला जाईल.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.