Swargate Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; पीडित तरुणीने केली 'ही' नवी मागणी

Pune Rape Case : या घटनेनंतर आरोपीला मुळगावी शिरूर तालुक्यातील गुणाट येथे अटक करण्यात आली होती. या बलात्कार प्रकरणात आता मोठा ट्विस्ट पहावयास मिळत आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने नवी मागणी केली आहे.
Swargate rape case
Swargate rape caseSarkarnama
Published on
Updated on

Pune News : स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. या धक्कादायक प्रकारानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी मोठी यंत्रणा कामाला लावली होती. त्यासाठी तब्बल 13 पोलिसांची पथकं तैनात करण्यात आली होती. या घटनेनंतर आरोपी त्याच्या मुळगावी शिरूर तालुक्यातील गुणाट येथे लपून बसला होता. त्या ठिकाणाहून त्याला अटक करण्यात आली होती. या बलात्कार प्रकरणात आता मोठा ट्विस्ट पहावयास मिळत आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने नवी मागणी केली आहे.

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये काही दिवसांपूर्वीच धक्कादायक घटना घडली होती. बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या घटनेनंतर शिवेसना (Shivsena) ठाकरे गटाने आक्रमकपणे आंदोलन करीत असताना तोडफोड केली होती. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळावून निघाले होते.

Swargate rape case
Congress vs Shivsena : काँग्रेसला 24 तासांत दुसरा धक्का? रवींद्र धंगेकरांनंतर आणखी एक माजी आमदार धनुष्यबाण हाती घेणार

पोलिसांनी या प्रकारानंतर फरार झालेला आरोपी दत्तात्रय गाडेला त्याच्या शिरूर तालुक्यातील गुनाट या गावातून अटक केली होती. त्याला अटक करण्यात आल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आरोपीने पीडितेवर दोनदा बलात्कार केल्याचे वैद्यकीय अहवालामधून समोर आले आहे. मात्र, या प्रकरणात आरोपीच्या कुटुंबीयांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. मात्र या प्रकरणात आता पीडितेच्या नव्या मागणीनंतर प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.

Swargate rape case
Karad : अतुल भोसलेंचा 'हेलिकॉप्टर शॉट'; अजितदादांच्या जोडीनं 'सेफ गेम' खेळणाऱ्या उंडाळकरांचं टेन्शन वाढवलं!

स्वारगेट बलात्कार प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दाखल झाला आहे. पुणे पोलिसांकडून (Pune Police) अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, अजय मिसर यांच्या नावाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, आता पीडित तरुणीकडून सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांना नियुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Swargate rape case
NCP Mlc News : जागा 1 इच्छुक शंभर, त्यात पुण्याचे 2 मेंबर; कोणाचा लागणार नंबर ?

पुणे पोलिसांकडून याबाबत वेगळेच स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यानुसार पीडित तरुणीने अर्ज देण्यास उशीर केल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात येत्या काळात सरकारी वकील कोण असणार? हे पहाणे महत्त्वाचं असणार आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Swargate rape case
NCP Kolhapur Politics : भाजप, शिंदेंनंतर आता अजितदादांचाही कोल्हापुरवर डोळा! शरद पवारांना देणार आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com