Shivsena : मुळची शिवसेना आमचीच; 'धनुष्यबाण'ही आम्हालाच मिळेल : शंभूराज देसाई

आम्ही शिवसेना Shivsena प्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Patil यांचे ज्वलंत हिंदूत्वाचे विचार Thoughts of Hinduism पुढे घेऊन चाललो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
Udhav Thackeray, Shambhuraj Desai
Udhav Thackeray, Shambhuraj Desaisarkarnama
Published on
Updated on

सातारा : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही वाटचाल करत असून आमची शिवसेना ही मुळची आहे. आमच्या पाठीमागे बहुमत असल्याने आम्हाला दृढ विश्वास आहे की, धनुष्यबाणाचे चिन्ह आम्हालाच मिळेल, असा विश्वास राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

नियोजन समितीच्या बैठकीनंतर मंत्री देसाई यांनी नियोजन भवनात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, नियोजन समितीचे कोणतेच प्रस्ताव आम्ही आडवलेले नाहीत. केवळ काही कामांच्या प्रस्तावात अंशत: बदल करणार आहोत. त्यासाठी लोकप्रतिनिधींचे प्रस्ताव घेतले जात आहे. येत्या मार्च २०२३ पर्यंत निधी खर्च झाला पाहिजे हा आमचा उद्देश असेल.

Udhav Thackeray, Shambhuraj Desai
आमदारांची मनं कळायला जयंतराव मनकवडे आहेत का...शंभूराज देसाई

जिल्ह्यात ९२ टक्के लसीकरण पूर्ण झाले असून साडे तीन लाख पशुधन जिल्ह्यात असून त्यापैकी तीन लाख दहा हजार लसीकरण पूर्ण झाले आहे. आगामी काळात जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदारांना ससोबत घेऊन त्यांच्या हातात हात घालून जिल्ह्यचा विकासाचा रथ पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असेल.

Udhav Thackeray, Shambhuraj Desai
Satara : ग्रेडसेपरेटर निरूपयोगी म्हणणाऱ्यांच्या बुद्धीची किव वाटते... खासदार उदयनराजे

न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे निकाल देण्याचा निर्णय दिला आहे, याविषयी त्यांची भावना जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. त्यावर शंभूराज देसाई म्हणाले, आमची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना असून बाळासाहेबांच्या हिंदूत्वाच्या विचारांची मुळ शिवसेना आहे. आमच्याकडे ५६ पैकी ४० आमदार व १८ पैकी १२ खासदार आहेत. तसेच बहुतांशी जिल्ह प्रमुख, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य आमच्याकडे असल्याने बहुमत आमच्या पाठीशी असल्याने निकालही आमच्या बाजूने लागेल.

Udhav Thackeray, Shambhuraj Desai
'स्वराज्यरक्षक' ऐवजी 'धर्मवीर' ; स्मारक आराखड्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी!

आम्हाला दृढ विश्वास आहे की शिवसेनेचे धनुष्यबान चिन्ह ही आम्हालाच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तुमच्यातील दुफळीचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे, असे विचारले असता ते म्हणाले आमच्यात भांडणे लावू नका. कुठल्याही परिस्थितीत नकारात्मक उर्जा येऊ देणार नाही. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत हिंदूत्वाचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com