Dhebewadi News : एका गावात जाहीर सभा आणि सत्काराचा कार्यक्रम सुरू असताना सुमारे आठ किलोमीटरवरील दुसऱ्या गावातील एका ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या तब्येतीची विचारपूस करताना ते आता खूप थकलेत जास्त हिंडत फिरत नाहीत, असे समजल्यावर जेवायला परत येतो असे संयोजकांना सांगून मंत्री देसाई रात्री आठच्या सुमारास तडक त्या गावाकडे रवाना होतात. त्या कार्यकर्त्याच्या घरी जावून तब्येतीची विचारपूस करून कुटुंब सदस्यांप्रमाणे घरच्यांना काही सूचना करून परत येतात.
सणबूर (ता.पाटण) येथे नुकत्याच घडलेल्या या प्रसंगाने राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची कार्यकर्त्याप्रतीची ओढ आणि तळमळ पुन्हा अधोरखित झाली. मंत्री पदाच्या जबाबदारीचा प्रचंड व्याप असतानाही शंभूराज देसाई कार्यकर्ते आणि जनतेसाठी भरपूर वेळ देत त्यांच्या अडीअडचणी व प्रश्न समजावून घेत असतात. यातून अनेकदा त्यांच्या साधेपणाची झलकही बघायला मिळते.
कधी चहाच्या टपरीवर चहा पिताना, गावाकडच्या छोट्या हॉटेलात बाकड्यावर बसून वडापाव खाताना,कार्यकर्त्याच्या घरी जमिनीवर बसून संवाद साधताना मंत्री देसाईंना अनेकदा जनतेने पाहिलेले आहे. जनता व कार्यकर्त्याविषयी या नेतृत्वात असलेली आपुलकी,तळमळ सणबूर
गावातील एका प्रसंगातून पुन्हा नजरेला पडली. तेथील ९३ वर्षीय लक्ष्मण तुकाराम जाधव (तात्या) हे लोकनेते बाळासाहेब देसाई, शिवाजीराव देसाई यांच्यापासूनचे देसाई घराण्याशी जोडलेले चार पिढ्यांपासूनचे कार्यकर्ते वयोमानानुसार आता थकले आहेत. मालदन येथे जाहीर सभा आणि सत्काराचा कार्यक्रम सुरू असताना व्यासपीठावर उपस्थितांकडे मंत्री देसाई यांनी सणबुरच्या तात्यांची तब्ब्येत कशी आहे अशी विचारणा केली.
त्यावर ते आता खूप थकलेत जास्त हिंडत फिरत नाहीत असे समजल्यावर सभा संपल्यावर जेवायला परत येतो असे संयोजकांना सांगून मंत्री देसाई रात्री आठच्या सुमारास तडक सणबुरकडे रवाना झाले. गावात कोणताही नियोजित कार्यक्रम नसतानाही रात्री मंत्र्यांसोबत वाहनांचा ताफा गावात आल्याने ग्रामस्थही आश्चर्यात पडले. मात्र जेव्हा त्यांना कारण समजले तेव्हा नेत्याच्या कार्यकर्त्यांप्रतीच्या ओढीची आणि प्रेमाची चर्चा उशिरापर्यंत तेथे रंगली.
लक्ष्मण जाधव यांच्या तब्ब्येतीची विचारपूस करून तुम्ही शंभरी पार करणार काही काळजी करू नका असे सांगत कुटुंबीयांशी चर्चा करून मंत्री देसाई तेथून.पुन्हा मालदनकडे रवाना झाले. याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे संचालक सर्जेराव जाधव,बबनराव जाधव,शिवाजीराव शेवाळे, टी. डी जाधव,एकनाथ जाधव,आप्पासाहेब मगरे,अमर जाधव,संतोष पाटील आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.