Hasan Mushrif News : संजीव ठाकूर प्रकरण तापलं; धंगेकर अन् मुश्रीफांमध्ये जुंपली

Ravindra Dhangekar : ठाकूरांना मुश्रीफ पाठिशी घालत असल्याचा धंगेकरांचा आरोप...
Hasan Mushrif, Ravindra Dhangekar
Hasan Mushrif, Ravindra DhangekarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणातील मुख्य दोषी असलेल्या ससून रुग्णालयातील डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावरून आता आमदार रवींद्र धंगेकर आणि उच्च वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा खेळ रंगला आहे. धंगेकर यांनी मुश्रीफ यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांनी देखील धंगेकर यांना सज्जड दम दिला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांची सहमती लागते, त्यासाठी अहवाल मी मुख्यमंत्र्यांना पाठवला असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. (Hasan Mushrif News)

धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या आरोपांना उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणाचा वैद्यकीय शिक्षण विभागाशी काहीही संबंध नाही. धंगेकर यांचे स्टेटमेंट चुकीचे आहे. पोलिसांनी ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र पोलिसांनी पाठवले आहे. मात्र ते वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांना मुख्यमंत्र्यांची (Chief Minister) परवानगी आवश्यक असते. आता आपले ई ऑफिस सुरु झाले आहे. त्यामुळे मी कारवाई संदर्भात कधी फाईल पाठवली, याची चौकशी करा मग समजेल, असा इशारा देत ठाकूर यांना पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नसल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Hasan Mushrif, Ravindra Dhangekar
Lalit Patil Drugs Case : आमदार धंगेकरांचा मुश्रीफांवर गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

कोणातीही मागणी नसताना आम्ही चौकशी समिती नेमली होती. समितीचा अहवाल येताच त्यांना पदमुक्त केले.एका डॉक्टरला निलंबितही केले. आमदार धंगेकर जे बोलतायेत ते खोटे आहे. विनाकारण गैरसमज पसरवण्याऱ्या गोष्टी सांगत असल्याची टीका मुश्रीफ यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धंगेकरांचा नेमका आरोप काय?

ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणातील मुख्य दोषी असलेले ससून हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत दोषी आढळत आहेत. ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी द्यावी, अशी विनंती पोलिसांनी केली आहे. मात्र सत्ताधारी पक्षातील काही मंत्री त्यांना वाचवित असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे डॉ. ठाकूर यांना पाठीशी घालत असून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी परवानगी मागितली आहे. मात्र 25 दिवस उलटून गेल्यानंतरही यासाठी परवानगी देण्यात आली नसल्याचा आरोप केला जात आहे.

भुजबळांची भेट घेणार

मराठा आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर बोलताना मुश्रीफ यांनी भुजबळांचे गैरसमज झाले असतील तर उद्या मी स्वतः त्यांना भेटणार असल्याची माहिती दिली. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील त्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, हे यापूर्वीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. भुजबळ यांचा गैरसमज दूर झाल्यानंतर वातावरण निवळून जाईल. मराठा समाजालाही आरक्षण मिळेल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

(Edited By - Rajanand More)

Hasan Mushrif, Ravindra Dhangekar
Ajit Pawar Kolhapur Tour : ‘मी, मुख्यमंत्री अन्‌ फडणवीस एकत्र बसून भुजबळांशी बोलणार’; भुजबळ तिघांचा सल्ला ऐकणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com