Ajit Pawar Kolhapur Tour : ‘मी, मुख्यमंत्री अन्‌ फडणवीस एकत्र बसून भुजबळांशी बोलणार’; भुजबळ तिघांचा सल्ला ऐकणार का?

Maratha-OBC Reservation : विरोधकांना टीका करण्याशिवाय आता दुसरं काही कामच राहिलं नाही.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : मराठा समाजाच्या आंदोलनानंतर ओबीसी समाजाकडून आता आंदोलनाची तयारी सुरु झाली आहे. सत्तेतील मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक घेत आंदोलनाचे हत्यार उपासण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत जाऊन भुजबळ यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले. मात्र, पत्रकारांनी प्रश्न केल्यानंतर ‘अरे बाबा...! चर्चा करण्यासाठी तरी दोन दिवस थांब. समज गैरसमज दूर करण्यासाठी वेळ दिला पाहिजे,’ असे वक्तव्य करत टोले लागवले. ('Chief Minister, I and Fadnavis will sit together and talk to Bhujbal': Ajit Pawar)

कुटुंबातील दोन भावंडाचा वाद कुटुंबप्रमुख दोघांना सोबत घेऊन मिटवतात. दोघांमध्ये झालेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर त्यांच्यातील वाद मिटतात. तसाच प्रयत्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतील, असेही अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar Kolhapur Tour)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar
Solapur NCP : वडील पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष; तर मुलगा अजितदादांच्या पक्षाचा तालुकाध्यक्ष!

विरोधकांना टीका करण्याशिवाय आता दुसरं काही कामच राहिलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी काम केलं आहे. विरोधकांमध्ये एकी राहिली नाही. ममता बॅनर्जी, नितीशकुमार हे आता वेगळी भूमिका मांडत आहेत. विरोधकांनी टीकाटिप्पणी करत बसावं. आम्ही आमचे काम करत राहणार, असेही पवार यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच कोल्हापुरातील शाहू विजयी गंगावेश तालमीला भेट देत परिस्थिती जाणून घेतली. त्यावर खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला. ‘आमच्याही तालमीत या,’ असे आव्हान दिले. तसेच, मुख्यमंत्र्यांना विरोध करणारा मंत्री बरखास्त करा, असेही त्यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar
OBC Melava : सग्यासोयऱ्यांच्या अधिसूचनेनंतर आक्रमक भुजबळ नगरमधून फुंकणार संघर्षाचे रणशिंग!

त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाचाळवीर लोकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास मी बांधील नाही. सरकारची कोणतीही मिलिभगत नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. विकासासाठी आम्ही एकत्र आहोत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता, मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार, हे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले

Ajit Pawar
Maratha Reservation Benefit : 'मराठा आरक्षणाच्या निर्णयाचा शिंदेंच्या शिवसेनेला फायदा; तर भाजपचा दुहेरी तोटा’

प्रफुल पटेल यांनी रविवारी पक्षाची भूमिका मांडली आहे. कोणत्याही समाजाला नाराज करून चालत नाही. मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे  यांनी शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगितलं आहे. मी, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस एकत्र बसून भुजबळ यांच्याशी बोलू. कुणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नाही.  मुंबईत गेल्यावर बोलीन, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

Ajit Pawar
INDIA Aghadi News : नितीशकुमारांनी राजीनामा देताच आंबेडकरांचा मोठा दावा; ‘इंडिया आघाडीचे भवितव्य संपले...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com