Shambhuraj Desai Son Wedding : 55 एकरांत मंडप, 70 हजार लोकांच्या जेवणाची सोय; मंत्र्याच्या मुलाचा होणार शाही विवाह

Shambhuraj Desai : मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री लावणार हजेरी, 65 एसटी बसेसमधून लग्नासाठी वऱ्हाड आणण्याची सोय
Shambhuraj Desai Son Wedding
Shambhuraj Desai Son Wedding
Published on
Updated on

Satara : सातारा जिल्ह्यासह, राज्यातील आमदार, खासदार, केंद्रीयमंत्री यांच्यासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज (रविवारी) होणाऱ्या मंत्री शंभूराज देसाई यांच्या पुत्राच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. हा विवाह सोहळा पाटणच्या दौलतनगर येथील कसबे मरळी येथे 50 ते 55 एकरांत गोरज मुहूर्तावर पार पडणार आहे. या लग्नाच्या तयारीची सध्या जिल्ह्यासह राज्यात चर्चा सुरू आहे. लग्न सोहळ्यानिमित्त तब्बल 70 हजार लोकांच्या जेवणाची सोय करण्यात येत आहे. 

Shambhuraj Desai Son Wedding
Buldhana News : तुपकरांच्या कानाखाली आवाज काढावाच लागेल; शिंदे गटातील आमदाराचं वादग्रस्त विधान

पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांचे पुत्र लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज यांचा विवाह धाराशिव जिल्ह्यातील राजे-निंबाळकर घराण्यातील डाॅ. वैष्णवीराजे हिच्याशी होत आहे. या सोहळ्याला केंद्रीयमंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे, मदत आणि पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड, सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्यासह राज्यातील खासदार आणि 50 आमदार हजेरी लावणार आहेत. (Shambhuraj Desai Son Wedding)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

55 एकर जागेत सोहळा

यशराज यांचा विवाह म्हणजे देसाई कुटुंबातील दीर्घ कालावधीनंतर होणारे मंगलकार्य आहे. त्यामुळे या सोहळ्यासाठी देसाई कुटुंबाने गेल्या महिन्याभरापासून जय्यत तयारी सुरू केली आहे. सोहळ्यासाठी दौलतनगर परिसरात सुमारे 50-55 एकर जागेत भव्य शाही मंडप उभारून चारी बाजूंना पार्किंगव्यवस्था, आकर्षक आणि सुसज्ज प्रशस्त बैठकव्यवस्था, तसेच भव्य अशी भोजनव्यवस्था, आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. सांगवड पूल ते मरळी गाव असे जवळपास 2 ते अडीच किलोमीटर अंतर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

एसटीने येणार वऱ्हाडी

मंत्री शंभूराज देसाईंच्या मुलाच्या लग्नासाठी पाटण मतदारसंघातील प्रत्येक घराघरात लग्नपत्रिका पोहोचविण्यात आली आहे. या सोहळ्यास 70 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सातारा, कराड आणि पाटण एसटी आगारातून 65 एसटी बसेसमधून लग्नासाठी वऱ्हाड आणण्याची सोय केली आहे. यासह कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ट्रॅव्हल्स, खासगी वाहनांची सोय केल्याने साधारण एक लाख लोक लग्न समारंभाला हजेरी लावतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

R...

Shambhuraj Desai Son Wedding
NitishKumar : नितीशकुमार CM पदाच्या प्रेमात, दोनदा ब्रेकअप; भाजपाला पुन्हा प्रपोज

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com