आमदार मोहितेंचा शिवसेना-भाजपला दणका; माजी उपनगराध्यांसह गोरे गटाचे कट्टर समर्थक राष्ट्रवादीत

निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतसे राष्ट्रवादीतील इनकमिंग वाढण्याची चिन्हे आहेत.
shivsena Leader Join ncp
shivsena Leader Join ncpSarkarnama

चाकण (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते (Dilip mohite) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला धोबीपछाड दिली आहे. यावेळी शिवसेनेबरोबर त्यांनी भारतीय जनता पक्षालाही (bjp) धक्का दिला आहे. शिवसेनेचे (shivsena) चाकणचे माजी उपनरागध्यक्ष धीरज मुटके आणि खेड बाजार समितीचे माजी संचालक काळूराम कड, तसेच भाजपचे संदीप परदेशी, श्रीकांत वाडेकर यांनी राष्ट्रवादीत (ncp) प्रवेश केला आहे. आणखी काहीजण ‘वेट ॲंड वॉच’च्या भूमिकेत आहेत, त्यामुळे निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतसे राष्ट्रवादीतील इनकमिंग वाढण्याची चिन्हे आहेत. (BJP office bearers including former Shiv Sena deputy council chairman join NCP)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम पुण्यात झाला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक काळूराम कड यांनी आमदार मोहितेंबरोबर काम करण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. माजी आमदार नारायण पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून कड यांची ओळख होती. त्यांना तालुक्यातील राजकारणाचा मोठा अनुभव आहे. पवार यांच्यानंतर त्यांनी माजी आमदार सुरेश गोरे यांच्यासोबत काम केले. गोरे प्रचार मोहिमेत काळूराम कड हे आघाडीवर असायचे, त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला महत्व आहे. शिवसेनेचे चाकणचे माजी उपनगराध्यक्ष धीरज मुटके यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

shivsena Leader Join ncp
आमच्यातील काही गद्दार शत्रूपक्षाला मिळाले : खेडमधील सत्तांतर आढळराव विसरेनात!

आमदार मोहितेंचे एकेकाळचे कट्टर समर्थक, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे चाकणचे माजी शहराध्यक्ष आणि चाकण नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपत गेलेले संदीप परदेशी, श्रीकांत वाडेकर हे पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत. याचबरोबर तरकारी अडते असोसिएशनचे अध्यक्ष कुमार गोरे, अल्पसंख्याक समाजाचे अध्यक्ष अल्ताफ शेख, जावेदभाई काकर आदींनीही राष्ट्रवादीत जाणे पसंत केले आहे.

shivsena Leader Join ncp
विमानतळ पुन्हा खेडला गेले, तर त्याची जबाबदारी संजय जगतापांची असेल!

चाकण नगरपरिषदेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता, तर राष्ट्रवादी काॅंग्रेस विरोधी बाकावर होती. सुरेश गोरे आमदार असताना शिवसेनेची सत्ता आली होती. मात्र, गोरे पराभूत झाल्यानंतर मात्र खेड तालुक्यातील राजकीय गणिते बदलू लागली आहे. आमदार दिलीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हे प्रवेश झाले आहेत. आणखी काहीजण उंबरठ्यावर आहेत.

shivsena Leader Join ncp
सभापतिपदाची निवडणूक : शिवसेना-काँग्रेस उमेदवाराचा विजय भाजपच्या हाती!

या प्रवेशाच्या वेळी आमदार दिलीप मोहिते, खेड तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, चाकण शहराध्यक्ष राम गोरे, नगरसेवक जीवन सोनवणे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष मुबीन काझी, राहूल नायकवाडी आदी उपस्थित होते. याबाबत आमदार मोहिते यांनी सांगितले की, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत चाकण, राजगुरुनगर, आळंदी शहरातून इतर पक्षात गेलेले कार्यकर्ते, काही पदाधिकारी पुन्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यानंतर तालुक्यात पक्षसंघटना अधिक भक्कम होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com